Solapur News : काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल काॅंग्रेससह अन्य विराेधक एकजूटीने भाजपशी लढा देत आहेत. देशभरात काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या मार्गाने निर्णयाच्या विराेधात आंदाेलन छेडले जात आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेंनी (mla praniti shinde) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) पत्र लिहून निर्णयावर जाब विचारला आहे. (Maharashtra News)
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याबाबतीत जाब विचारण्यासाठी पोस्टकार्ड पाठवलं आहे.
सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिस मधून हे पोस्टकार्ड पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्गांवरील पत्त्यावर हे पोस्टकार्ड पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान येत्या महिनाभरात 5 ते 10 हजार पोस्टकार्ड मोदींना पाठवणार असल्याचा निर्धार युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे अशी माहिती युवक काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.