Satara Crime News : 30 वासरांची कत्तल, 42 जिवंत ताब्यात, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; दाेघांवर गुन्हा दाखल

घटनास्थळावरुन संशयित आराेपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
Calf, Phaltan. Satara Crime News,
Calf, Phaltan. Satara Crime News, saam tv
Published On

Phaltan News : फलटण येथील मिरगाव येथे एका कत्तलखान्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकुण 42 जिवंत जर्शी गायीची वासरे व कत्तल केलेल्या 30 जर्शी गायीची वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी असा एकुण सहा लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Calf, Phaltan. Satara Crime News,
Mahila Maharashtra Kesari Kusti Spardha : महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मल्लांचे हाल, फरशीवर बसून लागलं जेवायला, पाण्याचा ठणठणाट

मिरगाव (ता. फलटण) येथे गायीची वासरे कत्तल करणेसाठी आणलेली आहेत अशी माहिती पाेलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मिरगाव (ता. फलटण) गावचे हद्दीतील वेताळबाबा मंदीरा शेजारी असणारे पोल्ट्री येथे पोलिसांनी धाड टाकली.

पोल्ट्रीमध्ये असणारे लोकांना पोलिसांची चाहुल लागताचा ते अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पोल्ट्रीमध्ये पोलीसांना अंदाजे 2 दिवस ते 40 दिवस या वयोगटातील एकुण 42 काळ्या, पांढऱ्या, तांबड्या रंगाची जर्शी गायीची वासरे कत्तल करण्यासाठीं आणलेली आढळून आली.

Calf, Phaltan. Satara Crime News,
Ratnagiri News : सातारा जिल्ह्यातील 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती; मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, ग्रामस्थांची साद

तसेच अंदाजे 30 जर्शी गायीची वासरे कत्तल केलेल्या वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी तसेच पोल्ट्रीमध्ये सर्वत्र रक्त, पाणी पडलेले दिसत होते. तसेच जनावरे कापण्यासाठी हत्यारे दिसत होती. पोल्ट्रीच्या बाहेर एक तीन चाकी वाहन हाेते. त्यात वासरांची कत्तल केलेले मांस व मुंडकी दिसुन आली.

याप्रकरणी घटनास्थळावरुन पळून गेलेले शब्बीर शेख (पुर्ण नाव उलपब्ध नाही) व सोपान शंकर सुळ यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com