Praniti Shinde Statement: सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनातही आदर होता मात्र त्यांचे 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे, असं वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. सतेच कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Political News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वीर सावरकरांविरोधात बोलताना त्यांनी म्हटले की, " सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आणि महिलांचा अपमान केला आहे. असं वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. त्याचबरोबर येणारी हजारो वर्षे हा देश महात्मा गांधी आणि नेहरुंचाच राहील. तो मोदी - सावरकरांचा कधीच नसेल असा दावा ही प्रणिती शिंदेंनी केला आहे.
सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू आहे. या कर्नाटक निवडणूकांच्या प्रचारात सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा सहभाग आहे. भाजपचे दोन्ही देशमुख बेळगाव आणि विजापूर मतदारसंघाची जबाबदारी सांभळत आहेत. दरम्यान, राजकीय विषयावर बोलताना प्रणिती शिंदे यांना कर्नाटक निवडणूकांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता येणार, असं त्या ठामपणे म्हणाल्या.
"कर्नाटकातील दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघात मी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या निरीक्षणानुसार, सध्याचे वातावरण हे काँग्रेसला (Congress) पुरक असून कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.