संजय गडदे
Crime News :आपल्याकडे खूप पैसा असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, यासाठी सर्वाधिक फायदा देणारा काहीतरी व्यवसाय करून झटपट पैसा कमावण्याचे साधन शोधून ते स्वप्न पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी निवडलेला हा मार्ग थेट तुरुंगात घेऊन जाईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना जाणवत नाही. (Crime News)
कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी अंमली पदार्थ र्विक्रेता बनलेल्या एका उच्चशिक्षित अभियंत्याला मुंबईच्या कांदिवली गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेलने (Narcotics Control Bureau) अटक केली आहे. प्रियांक मेहता (२९ वर्षे) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव असून तो अहमदाबादचा रहिवासी असून तो मुंबईतील मालाड पक्षी माइंड स्पेस येथे एका इंटरनॅशनल कॉल सेंटरमध्ये काम करत आहे.
प्रियांक मेहता याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एक किलो 230 ग्राम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 38 लाख रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिमला येथून अंमली पदार्थ आणून ते मुंबईतील विविध कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणींना विकले जात असल्याची माहिती कांदिवली अँटी नार्कोटिक्स सेलच्या सीनियर पीआय रुपेश नाईक यांना समजली. या माहितीवरून अंमली पदार्थ विभागाने चारकोप परिसरात सापळा रचला.
जवळपास 15 दिवस परिसरात पोलीस डोळ्यात तेल घालून त्या अंमली पदार्थ विक्रेत्याची वाट पाहत होते. यादरम्यान चारकोप येथील रहिवासी प्रियांक मेहता शिमला येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रियांक शिमल्याहून आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन परतल्याची माहिती नार्कोटिक्स विभागाला मिळाली.
कांदिवली अँटी नारकोटिक्स युनिटने प्रियांक मेहताच्या घरावर छापा टाकला.अंमली पदार्थ विभागाला त्याच्या घरातून 1 किलो 230 ग्रॅम उच्च प्रतीचे अंमली पदार्थ मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 38 लाख आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विभागाच्या तपासात अटक आरोपी हा बी.टेक इंजिनीअर असल्याची माहिती मिळाली. तो मालाड येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये सल्लागार म्हणून काम करतो. मात्र अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या नादात मालाडच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुला-मुलींना अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे समजले आहे. सध्या पोलिसांनी प्रियांक मेहता याला एनडीपीएस कायद्यान्वये अंमली पदार्थांसह अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस मुख्य आरोपीचा शोध घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.