पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही, सरकार दिशाभूल करतंय; प्रकाश आंबेडकरांचे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Indus Water Treaty : २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Prakash Ambedkar on pakistan indus water treat
Prakash Ambedkar on pakistan indus water treatSaam Tv News
Published On

अहिल्यानगर (शिर्डी) : जम्मू-काश्मीरमच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचं सांगण्यात आलं. मात्र, २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकरांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

'पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अटारी वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचं सांगण्यात आलं. मात्र, हा करार रद्द केल्याचं खोटं सांगितलं जातंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.' पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच त्यांनी दाखवलं. 'या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही,' असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar on pakistan indus water treat
बहिणीच्या लग्नाला आला अन् अनर्थ घडला, सासऱ्याचा जावयासह लेकीवर धाडsss धाडsss गोळीबार; जळगावमध्ये सैराट

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात झालेल्या हत्याकांडाबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'जातीच्या बाहेर जाऊन लग्न करणाऱ्यांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जातीच्या बाहेर जाऊन लग्न केलं आणि कुटुंबाने जर हिंसा केली तर त्यापासून संरक्षण सरकारने दिलं पाहिजे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar on pakistan indus water treat
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात वाढ करुन देण्यावरुन बड्या नेत्याचा 'यू-टर्न', २१०० रुपये देऊ असं म्हटलंच नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com