औरंगाबाद : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनीअरींगचा वापर करत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षासोबत तसेच इतर छोट्या संघटनांसमवेत संधान साधत राज्यातील भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांना विविध ठिकाणी तुल्यबळ लढत दिली.
आंबेडकर-ओवेसी फॉर्म्युल्याचा सर्वात जास्त फटका राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ४० लाखाच्या वर मते मिळवत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ने मोठी राजकीय ताकद दाखवून दिली होती. मात्र, अंतर्गत कलहामुळे हि युती 2019 च्या विधानसभेला कायम राहिली नाही. विधानसभेला वंचित आणि एमआयएम वेगळे लढले.
हे देखील पहा :
मात्र, आता पुन्हा याच पॅटर्न ची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन असदुद्दीन यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून ओवेसी यांनी वंचित-एमआयएम आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आंबेडकर आणि ओवेसी एकत्रितपणे लढू शकतील असा अंदाज ओवेसी यांच्या संकेतांवरून बांधला जाऊ शकतो. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नसतं; कधीही काही होऊ शकतं या सूत्रानुसार जर वंचितची तयारी असेल तर आम्ही जरूर आघाडी करू असेही ओवेसी म्हणाले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाची लढाई राज्यात सुरु असतानाच आता मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात उतरली असून मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार काढण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम वाहनांची रॅली काढणार आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी हि घोषणा केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून एमआयएमचे कार्यकर्ते तिरंगे झेंडे घेऊन मुंबईवर धडकणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण मिळावे हि प्रामुख्याने मागणी या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामुळे आता मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. या रॅली आणि मोर्चानंतर मुंबईत अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार असल्याची माहिती खा. जलील यांनी दिली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.