...पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही- संजय राऊत

करंदीकर व्याख्यान मालेच्या उद्धाटन सोहळ्यासाठी संजय राऊत आज पुण्यामध्ये आले होते.
...पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही- संजय राऊत
...पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही- संजय राऊत Saam Tv News

प्राची कुलकर्णी

पुणे: पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानाला आज सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राउत उपस्थित होते. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात बोलताना नेहमी प्रमाणे जोरदार फटकेबाजी केली आहे. व्याख्यान बोलले की भिती वाटते पण भाषण चालते अश्या शब्दात त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पत्रकार संघात येऊन व्याख्यान द्यायचं म्हणजे अभ्यास करुन बोलावं लागतं. पण माझी काय परंपरा तशी अभ्यास करुन बोलायची नाही असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी बोलताना सध्याच्या पत्रकारितेवर निशाना साधला ते म्हणाले ''सोशल माध्यमातून जे पत्रकारांचं पिक आलंय त्यावरून असं वाटतंय की झक मारली इतकी वर्ष''. आपण लिहायला विसरलो आहोत. माझ्यामुळं मिडीयाला काम मिळतं परिवर्तनीची ताकद वृतपत्रात आहे असल्याचं राऊत म्हणाले.

...पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही- संजय राऊत
तालिबानचा प्रश्न विचारताच पाकिस्तानी पत्रकार आणि नबी भिडले; पाहा Video

भाषणा दरम्यान त्यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे. पत्रकारांना पार्लमेंट मधील सेंट्रल हॅाल मध्ये येणं केंद्र सरकारने बंद केलं आहे. कोविडचं निमित्त झालं पण त्यांना ते बंदच करायचंच होतं. त्यांना स्वतंत्र पद्धतीची पत्रकारिता नको आहे. दिल्लीत मंत्र्यांवरही लक्ष असतं कोण कोणत्या पत्रकाराशी बोलत असतो. या बंदीवर कोणी आवाज उठवला नसल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे. ''आणिबाणीतही पत्रकारांना रोखलं नव्हतं गेले ७२ तास मी पहातोय - कोणत्याही क्षणी आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर येईल - हे काल पासून सुरु आहे मी पहातोय. मन्नतवर गर्दी आहे- मन्नत वर फटाके वाजतायत. बहुतेक त्यात शाहरुख आहे अशी पत्रकारिता सध्या सुरु असल्याचं राऊत म्हणाले.

२४ तास सगळी माध्यमं एका प्रकरणात अडकलेल्या एका मुलाच्या मागे राहता. एरवी पेट्रोल महागाई हे विषय दिसतात. आर्यन खान आल्यावर आर्यन खान विषयाला बातम्या म्हणायचं की मनोरंजन या देशातल्या राज्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र मिडीया नको आहे. विरोधी पक्ष सक्षम असावा वृतपत्राच्या कार्यालयावर धाडी घालण्यात आल्या- इतर वृतपत्र त्यांच्या बाजुने उभी राहिली का? ज्यांना कोळशाचे - इतर उद्योग करायचे आहेत त्यांना देशाचे वृतपत्र - मिडीया विकत घेत आहेत. म्हणजे मालक- मिडीया त्यांच्या ताब्यात राहतील अशी सडकून टीका संजय राऊतांनी केंद्रावर केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com