- जितेश कोळी
Ratnagiri News : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील लांजा येथील एका अल्पवयीन मुलीला (girl) गर्भवती केल्या प्रकरणी संशयित आरोपीस पोक्सो विशेष न्यायालयाने वीस वर्षे सक्त मजुरी व चाेवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा लांजा पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल गंभिर आणि पोलिस निरीक्षक श्वेता पाटील यांंनी तपास केला. तसेच पैरवी अधिकारी म्हणून कदम यांनी काम पाहिले हाेते. (rantagiri latest marathi news)
न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आराेपीचे नाव अक्षय शिवाजी गवड (23,मुळ रा.बादेवाडी पन्हाळा,कोल्हापूर सध्या रा.लांजा,रत्नागिरी) असे आहे. अक्षय हा मूळचा कोल्हापूरचा आहे. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात त्याचे वास्तव्य होते. लांजा येथील एका अल्पवयीन मुलीशी ओळख करुन तिच्याशी मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत त्याने शारिरीक संबंध ठेवले होते.
काही दिवसांनी पिडीतेला त्रास जाणवू लागल्याने तिच्या आईने तिला लांजा येथील खासगी डॉक्टरकडे नेले होते. परंतू तिचा त्रास वाढल्याने तिच्या आईने तिला अधिक उपचरांसाठी कोल्हापूरला नेउन त्याठिकाणी तिची सोनोग्राफी केली. त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान पिडीतेच्या आईने याबाबत अक्षय गवड विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतू हा गुन्हा लांजा येथे घडल्याने हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी लांजा पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला न्यायालयात सुरु होता. शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधिश वैजयंतीमाला राउत यांनी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी 18 साक्षिदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी अक्षय यास दोषी ठरवून 20 वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याचा लांजा पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल गंभिर आणि पोलिस निरीक्षक श्वेता पाटील यांंनी तपास केला.तसेच पैरवी अधिकारी म्हणून कदम यांनी काम पाहिले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.