पुणे नवरात्रौ महोत्सव २०२२ : प्रमुख मान्यवरांच्या मांदियाळीत उत्सव रंगणार, वाचा सविस्तर

पुण्यात नवरात्रौ महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आलं आहे.
Pune Navratri festival 2022
Pune Navratri festival 2022saam tv
Published On

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात नवरात्रौ महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आलं आहे. हा नवरात्रो महोत्सव २६ सप्टेंबरला सुरु होणार असून ५ ऑक्टोबरला या मोहत्सवाची सांगता होणार आहे. सोमवारी २६ सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजता सहकारनगरमधील शिवदर्शन येथे श्री लक्ष्मीमाता मंदीरात हा उत्सव संपन्न होणार आहे. आबा बागुल यांच्याहस्ते घटस्थापना केली जाणार आहे. तसेच पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. सकाळ आणि साम या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक असणार आहेत. (Pune Navratri festival 2022 update)

Pune Navratri festival 2022
ठाकरे कुटुंब जेलमध्ये जाणार, नारायण राणेंनी डागली तोफ, म्हणाले....

पुण्यातील नवरात्रौ महोत्सवात सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन सोहळा २६ सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते या महोस्तवाचे उद्घाटन होणार आहे. तर माजी आमदार उल्हासदादा पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

हा नवरात्रौ उत्सव राजकारण्यांसह सिने कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीष बापट, खासदार वंदनाताई चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव, आमदार संग्रामदादा थोपटे, बालन ग्रुपचे चेअरमन पुनीत बालन, आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार माधुरी मिसाळ, माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे यांची उपस्थिती असणार आहे.

तसेच पुण्याचे माजी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार दिप्ती चौधरी, उद्योजक विशाल चोरडीया, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलीस अमिताभ गुप्ता तसेच सिने कलाकारांची विशेष उपस्थिती असणार आहे. यामध्ये पुजा बिरारी, पुर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मिरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव, नुपूर दैठणकर या कलाकारांचा सामावेश आहे.

Pune Navratri festival 2022
ठाकरे कुटुंब जेलमध्ये जाणार, नारायण राणेंनी डागली तोफ, म्हणाले....

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

२६ सप्टेंबरला या नवारात्रौ महोत्सवाचा उद्धाटन समारंभ पार पडणार आहे. या दिवशी महाकाली चंड चामुंडा, महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री, अवतार जगदंबेचा, बॉलिवूड २०२२, वन्समोर रफी साहब कॅलिडोस्कोप हे कार्यक्रम होणार आहे. २७ सप्टेंबरला नवशक्ती, २८ सप्टेंबरला सजदा, २९ सप्टेंबरला नॉस्टॅल्जिक मेलडीज्, ३० सप्टेंबरला द रिदम किंग, १ ऑक्टोबरला लावणी महोत्सव, २ ऑक्टोबरला स्वर सम्राज्ञी लता दिदी, ३ ऑक्टोबरला कोयल सी बोली तेरी, ४ ऑक्टोबरला तालयात्रा आणि ५ ऑक्टोबरला उत्तरंग हा कार्यक्रम होणार आहे.

श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार २०२२ चे मानकरी

१) पी.डी. पाटील, कुलगुरु

२) निशिगंधा वाड, ज्येष्ठ सिने अभिनेत्री

३) मितेश घट्टे,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण

४) प्रविण तरडे, अभिनेते व दिग्दर्शक

५) अंकुश काकडे (सामाजिक)

६) प्रियांका गौतम, लावणी सम्राज्ञी विशेष पुरस्कार

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com