
मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये काल शिवसेनेची सभा घेतली. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असा इशारा देत ठाकरे यांनी काल झालेल्या मेळाव्यात भाजपसह शिंदे गटावर तोफ डागली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस आहे. ठाकरे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात. १० आमदार निवडूण आणण्याची ठाकरेंची ताकद नाही. पदासाठी, पैशांसाठी, हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे आहेत, ठाकरे कुटुंब जेलमध्ये जाणार, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Narayan Rane criticises uddhav Thackeray in press conference)
पत्रकार परिषदेत राणे ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, मातृभूमीसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस आहे. ठाकरे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात. १० आमदार निवडूण आणण्याची ठाकरेंची ताकद नाही. पदासाठी,पैशांसाठी, हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा आहेत. अमित शहांना आव्हान देण्याची औकात आहे का? उद्धव ठाकरेंनी मुंबई बकाल केली.
भावना गवळींबद्दल बोलताना जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शिंदे-गट भाजपच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. उद्धव ठाकरेंनी आयुष्यात तलवार कधी पकडले का? मोदी अमित शहा नेहमी महाराष्ट्राला मदत करतात. ठाकरेंनी आयुष्यात मर्दासारखं काम केलं नाही. मोदींचं नाव घेवू नका, तुम्हाला जड जाईल, ठाकरे मोदींच्या नखाएवढेही नाहीत. वाकड्या नजरेनं बघाल तर महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. ठाकरेंनी नैराश्यातून कालच्या मेळाव्यात भाषण केलं. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे, अशा कठोर शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.