Maharashtra Politics: खासदार धैर्यशील मोहितेंनी १५ ते १७ खून पचवले, स्थानिक नेत्याचा खळबळजनक दावा
Summary -
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
माजी उपसरपंचाने खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर १५ ते १७ खून केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गाव बंद ठेवून गुन्हे मागे घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
धैर्यशील माहिते पाटील यांनी कुर्डू गावाची तुलना बीडशी केल्यामुळे गावकरी संतप्त झालेत.
भरत नागणे, सोलापूर
सोलापुरच्या कुर्डू गावातील मुरूम उत्खनन प्रकरण आता राज्यभरात चांगेलच चर्चेत आले आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात कुर्डू गावच्या माजी उपसरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाला बीडची उपमा दिली होती. त्यावरून गावात संतापाची लाट आहे. धैर्यशील यांच्या वक्तव्यानंतर माजी उपसरपंचाने त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी १५ ते १७ खून पचवले.', असा खळबळजनक दावा माजी उपसरपंचाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील कुर्डू गावातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले गावचे माजी उपसरपंच अण्णा ढाणे यांनी थेट माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. 'धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे वाल्मीक कराड आहेत. त्यांनी अकलूजमध्ये १५ ते १७ खून केले आहेत. माझ्या मित्राची देखील त्यांनी सुपारी देऊन हत्या केली', असा गंभीर आरोप अण्णा ढाणे यांनी केला आहे.
आज अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी कुर्डू गाव बंद ठेवण्यात आले आहे. गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या बंदमध्ये सर्व गावकरी सहभागी झाले आहेत. यावेळी अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाची तुलना बीडशी केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावातील रस्त्यासाठी मुरूम उपसा करताना प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई चुकीची आहे. त्यामुळे दाखल झालेले गु्हे मागे घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

