IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

Revenue Officer Assaulted IPS Anjana Krishna Row : कुर्डू गावात बेकायदेशीर खाणकामाच्या विरोधात कारवाई करताना एका महसूल अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक बेसबॉल स्टिकने हल्ला करताना दिसत आहेत.
IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video
Published On
Summary
  • माढ्यातील कुर्डू गावात महसूल अधिकाऱ्याला कारवाईदरम्यान गावकऱ्यांनी मारहाण केली.

  • अवैध उत्खनन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

  • गावकऱ्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • याआधी IPS अंजना कृष्णा आणि अजित पवार फोन कॉल प्रकरण चर्चेत आलं होतं.

माढ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरणी नवी घटना समोर आलीय. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखल्यानंतर आता एका महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात काही गावकऱ्यांच्या हातात बेसबॉल स्टीक दिसत आहे.

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video
IPS अंजना कृष्णा प्रकरण पंतप्रधान मोदींकडे; कडक कारवाई करा,सुप्रिया सुळेंची मागणी

दोन-तीन दिवसापूर्वी आयपीएस अंजना कृष्णा यांचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला होता. अंजना कृ्ष्णा ह्या अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या एकाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. त्यानंतर त्याने तो फोन महिला अधिकारी यांच्याकडे दिला. त्यावेळी अजित पवार यांनी महिला अधिकारी यांना कारवाई करण्यापासून रोखलं. त्यांचे फोनवरील संभाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video
Who Is IPS Anjana Krishna: महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

त्यानंतर आता माढ्यातील कुर्डू गावात एका महसूल अधिकाऱ्याला मारहाण झालीय. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राष्ट्रवादीचे तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आलीय. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला गावातील गुंडांनी मारहाण केली. तर पोलिसांनी व काही गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय, यात काही गुंड या अधिकाऱ्यांना बेसबॉल स्टीकने मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com