Political News : राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! माणगावमध्ये शिवसेनेसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : माणगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.
Maharashtra Political News
Maharashtra Political News AI Image
Published On: 

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यास सुरुवात केली असून, एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माणगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, या घडामोडीनंतर अवघ्या आठवडाभरातच राजकीय चित्र बदलले. शिवसेनेसह इतर पक्षांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीनेही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असतानाही माणगावमध्ये एकमेकांसमोर राजकीय ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे जड ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Political News
Train Ticket : तुमच्या नावाच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती करू शकणार प्रवास, रेल्वे विभागाचा नवा नियम

दरम्यान, माणगाव येथील कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या विभाजनाबाबत महत्त्वाचे विधान केले. रायगड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यास त्याचे मुख्यालय माणगाव येथे करण्याबाबत त्यांनी माणगावकरांना आश्वासन दिले. तटकरे यांच्या या विधानामुळे रायगड जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Maharashtra Political News
Pune : पुण्यात खळबळ! भाजप आमदाराच्याच घरात चोरी; पॉश सोसायटीत घडला धक्कादायक प्रकार; नेमकं काय चोरीला गेलं?

गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. नवीन जिल्हा निर्माण झाल्यास माणगावच्या विकासाला चालना मिळू शकते. तसेच परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे माणगावला जिल्ह्याचे मुख्यालय मिळणार का, याची उत्सुकता आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एकीकडे पक्षांतराचे राजकारण आणि दुसरीकडे नवीन जिल्ह्याच्या घोषणेचे संकेत, यामुळे माणगाव सध्या रायगडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.