Education Officer : शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड ! प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगेवर 420 चा गुन्हा दाखल

शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाने खातरजमा न करता दिली तुकडीस मान्यता.
Education Officer Savita Birge, Nanded News
Education Officer Savita Birge, Nanded Newssaam tv
Published On

Nanded Crime News : अधिकार नसताना एका शाळेच्या तुकडीस वर्ग वाढ दिली. या संदर्भातील संचिका गहाळ केल्याचा ठपका ठेवत पुणे शिक्षण आयुक्तांच्या आदेशानंतर नांदेडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे (education officer savita birge) यांच्यावर फसणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Education Officer Savita Birge, Nanded News
Dance Bar : साम टीव्हीनं सरकारला केलं जागं; डान्सबारवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही..., (पाहा व्हिडिओ)

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे यांनी अर्धापूर येथील एका संस्थेला नियमबाह्य नैसर्गिक वर्ग वाढ करण्याची मान्यता दिली. एवढेच नाहीतर ती फाईलच गहाळ करीत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Maharashtra News)

Education Officer Savita Birge, Nanded News
Viral Video : याला म्हणतात जिद्द, आत्मविश्वास! कबड्डी खेळतानाचा आजीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार लातूरच्या उपविभागीय कार्यालयाला समजताच त्यांनी पुणे येथील मुख्य कार्यालयाला तशी माहिती कळविली. त्या कार्यालयाच्या आदेशावरून अखेर वजिराबाद पोलिस ठाण्यात डॉ. सविता बिरगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे सविता बिरगेंना काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये त्याच पदावर असताना चार लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यानंतरही बिरगेंच्या उचापती थांबल्या नाहीत.

Education Officer Savita Birge, Nanded News
Youth Arrested In Nagar : नवी मुंबईत महिलेचा निर्घृण खून, युवकास नगरला अटक; शिरूरच्या पतपेढीत साेनं गहाण

नांदेडच्या (nanded) प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्याच विभागात अनागोंदी कारभाराचे दर्शन पहावयास मिळत आहे. माळेगावच्या यात्रेनंतर पशुसंवर्धन विभाग, त्यानंतर जलजीवन मिशन आणि आता तर चक्क शिक्षण विभागाच चर्चेत आला आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे यांनी (28 डिसेंबर 2016 ते आजपर्यंत) आपल्या कार्यकाळात विविध गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Education Officer Savita Birge, Nanded News
Conversion of Religion : देवाची आळंदीत जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाची घटना, तिघांवर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

अर्धापूर येथील श्री साई शिक्षण संस्था लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर संचलित आदर्श प्राथमिक विद्यालय अर्धापूर या शाळेत मराठी माध्यमासाठी पाचवी ते सातवी वर्गाला नैसर्गिक वर्ग वाढ करण्यात मान्यता आदेश निर्गमित करताना शिक्षण अधिकारी प्राथमिक बिरगे यांच्या कार्यालयाने सत्यासत्त्येतेबाबत कोणतीही खातरजमा केली नाही.

Education Officer Savita Birge, Nanded News
Lohgad Fort : लाेणावळा पाेलिस सतर्क, लाेहगडावर जमावबंदी आदेश लागू

यावरून हे आदेश त्यांच्या कार्यालयाकडून कार्यान्वित करण्यात आलेले असून त्यानंतरही संचिका गहाळ झाली आहे. वरील परिस्थिती पाहता सदरील आदेशाचा गैरफायदा संबंधित संस्थेला व्हावा या हेतूने डॉ. सविता बिरगे यांनी सदरचे आदेश निर्गमित करून शासनाची फसवणूक केली हे तपासणीत निष्पन्न झाले.

Education Officer Savita Birge, Nanded News
Mid Day Meal : उंदराच्या लेंड्या, अळ्यांसह खिचडी खाऊ घातली, ग्रामस्थांचा आराेप; विद्यार्थी रुग्णालयात दाखल

या प्रकरणाची चौकशी मागील अनेक वर्षापासून सुरू होती. लातूरच्या (latur) शिक्षण उपविभागीय कार्यालयाला पुणे येथील आयुक्त सुरज मांढरे यांनी पत्रव्यवहार करून या संबंधात कारवाईचे आदेश दिले होते. अखेर यावरून अधीक्षक, शिक्षण संचालनालय पुणे दीपक अर्जुन पाटील यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Education Officer Savita Birge, Nanded News
Pune News : 31 डिसेंबरच्या रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीला छेडले, गुन्हा दाखल

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार करत आहेत. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांनी लक्ष घातले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com