Arrest, Navi Mumbai
Arrest, Navi MumbaiSaam Tv

Youth Arrested In Nagar : नवी मुंबईत महिलेचा निर्घृण खून, युवकास नगरला अटक; शिरूरच्या पतपेढीत साेनं गहाण

लिलाबाईंनी त्याला खाेली साेडण्यास सांगितले हाेते.
Published on

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Crime News : उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील एका सत्तर वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी पाेलिसांनी एकास अटक केली आहे. दरम्यान खूनानंतर संबंधिताने महिलेच्या अंगावरील दागिने गायब केले हाेते. त्याने ते गहाण ठेवल्याची माहिती समाेर आली आहे. आता पाेलिस (police) या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Arrest, Navi Mumbai
Conversion of Religion : देवाची आळंदीत जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाची घटना, तिघांवर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

उरण मधील बोकडविरा गावात राहणाऱ्या लिलाबाई ठाकुर या जेष्ठ महिलेची हत्या करून फरार झालेल्या अमोल शेलारला उरण पोलिसांनी नगर येथुन अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अमोल शेलार हा नेहमी दारु पिऊन रुमवर येत होता. ताे लिलाबाई यांच्याकडे भाड्याने राहत हाेता.

Arrest, Navi Mumbai
Dance Bar Video Viral : मंत्री शंभूराज देसाईंचे काेणी ऐकेना, डान्स बारचा व्हिडिओ व्हायरल

लिलाबाईंनी त्याला वीस हजार रुपये उसने दिले होते. तसेच अमाेल हा त्यांना घरभाडे देखील देत नव्हता. पैसे देत नसल्याने लिलाबाईंनी अमोल याला रुम साेडण्यास सांगितले होते. त्यामुळे त्याने चिडून लिलाबाईंचा खून केला.

Arrest, Navi Mumbai
Satara News : आप्पा मांढरे गाेळीबार प्रकरण; धक्कादायक माहिती उघड, युवक पाेलिसांच्या ताब्यात

त्याने लिलाबाईंच्या घरातील नव्वद हजार रुपयांचा सोन्याचा हार आणि लिलाबाई यांच्या अंगावरून सात तोळे वजनाचे दागिने (gold) घेऊन पळ काढला हाेता. त्याला नगर येथे अटक करण्यात आली आहे. त्याने दागिने शिरूर येथील एका पतपेढीत गहाण ठेवल्याची माहिती समाेर आली आहे असेही पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com