Sudarshan Datir
Sudarshan DatirSaam tv

Sudarshan Datir: 'मित्रा...अर्ध्यात साथ सोडलीस’; पोलीस अधिकाऱ्याला खांदा देताना सहकाऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला

‘अमर रहे, अमर रहे, सुदर्शन दातीर अमर रहे’च्या घोषात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यावर अंबड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published on

Nashik Police Accident: ‘अमर रहे, अमर रहे, सुदर्शन दातीर अमर रहे’च्या घोषात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यावर अंबडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खांदा दिला, तेव्हा रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला आणि सारेच शोकसागरात बुडाले. (Latest Marathi News)

सुदर्शन दातीर जळगाव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. २९ जून रोजी ते एरंडोल-कासोदा रस्त्याने शासकीय वाहनातून जात होते. पण तिथेच त्यांना मृत्यूनं गाठलं. एक भल मोठं झाड त्यांच्या गाडीवर कोसळलं. यावेळी दातीर यांच्यासह असलेले चालक अजय चौधरी देखील मरण पावलेत.

Sudarshan Datir
Jalgaon Accident News: तपास पथकाच्‍या वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार; तिघे जखमी

नेमकं काय घडलं?

सुदर्शन दातीर, अजय चौधरी आणि अजून तीन अधिकार एकत्र प्रवास करत होते. जळगावच्या एरंडोल-कासोदा रस्त्यावरून ते कामासाठी निघाले..पण वाटेत एक जीर्ण झालेलं चिंचेचं झाड त्यांच्या गाडीवर कोसळलं.

झाडाच्या वजनानं गाडी जागीच चेपली गेली. आणि दातीर, चौधरी मृत्युच्या कचाट्यात आले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सुर्यवंशी, भरत जेठवे हे थोडक्यात बचावलेत. पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं त्यांना कसं बसं बाहेर काढण्यात आलं यावेळी परिसरात प्रचंड ट्रॅफिक जॅम झालं होतं.

शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार

एपीआय सुदर्शन दातीर हे नाशिकच्या अंबड येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अंबड गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गावकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव अंबड येथील निवासस्थानी आणल्यानंतर नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. दुपारी २.३० च्या सुमारास अंबड गाव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sudarshan Datir
Beed Crime News: परळीत कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर; गुत्तेदाराची हत्या

नाशिक-जळगाव पोलीस दल गहिवरले

दातीर यांच्या अपघाती निधनामुळे नातलगांसह पोलिस दल हादरले. ‘मित्रा...अर्ध्यात साथ सोडलीस’, असे म्हणत पोलिस दलातील त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले. सुदर्शन दातीर हे एका शेतकरी कुटुंबातून आले होते. मेहनत आणि कष्टाच्या जोरावर ते पोलीस झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं सगळ्याच्यांच मनाला चटका लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com