Beed Crime News: परळीत कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर; गुत्तेदाराची हत्या

Beed Crime News: परळी पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा परळीलगत गुत्तेदाराची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे
atmaram munde beed news
atmaram munde beed news saam tv
Published On

Beed News: बीडच्या परळीत पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात हत्या झाल्याची घटना ताजी असताना काल परळी पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा परळीलगत गुत्तेदाराची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात ही हत्या झाली आहे. आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे असं हत्या झालेल्या गुत्तेदाराचे नाव आहे.

atmaram munde beed news
Kolhapur Crime News: धक्कादायक! एकमेकांकडे बघण्यावरुन वाद; आईसह दोन मुलांना बेदम मारहाण

दरम्यान, या घटनेने परळी शहरात व कन्हेरवाडी गावात खळबळ माजली असून दिवसेंदिवस परळी आणि परिसरात हत्येच्या , हाणामारीच्या घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बीडमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

बीडमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. गावातीलचं एकाने अगोदर अत्याचार केला आणि त्यानंतर 2 मित्रांच्या मदतीने तिला पुण्याला पळवून नेले. दोघे आरोपी अल्पवयीन असल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

atmaram munde beed news
Mumbai Crime News: ती लोकलची वाट पाहत उभी, तो दबक्या पावलांनी आला अन्... धक्कादायक VIDEO

बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुला आणि मुलीची मैत्री झाली. मुलीचे वय अवघे 13 असून मुलांचेही त्यापेक्षा दोन वर्ष जास्त आहे. 26 जून रोजी गावातीलच एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

atmaram munde beed news
Pune Crime News: जिवाभावाच्या मैत्रिणीने केला घात; तरुणीचे नकोत्या अवस्थेतील फोटो व्हायरल, कुटुंबीयांनी पाहताच...

त्यानंतर इतर दोन मित्रांच्या मदतीने ते अहमदनगरपर्यंत गेले. तेथून दोन मित्र परत आले तर पीडित मुलगी व मुलगा हे पुण्याला गेले. पुण्यातील एका नातेवाइकांकडे त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. काही तास राहिल्यानंतर नातेवाइकांना यांच्याबद्दल संशय आला. त्यांनी गावाकडे विचारणा केल्यावर हे पळून आल्याचे समजले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com