Pune Crime News: जिवाभावाच्या मैत्रिणीने केला घात; तरुणीचे नकोत्या अवस्थेतील फोटो व्हायरल, कुटुंबीयांनी पाहताच...

Crime News: एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्याच मैत्रिणीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
Nagar Crime News
Nagar Crime NewsSaam TV
Published On: 

अक्षय बादवे

Pune News: विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे या शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्याच मैत्रिणीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या घटनेमुळे कॉलेजसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मित्रांशी मैत्री करण्यास नकार दिल्यामुळे तरुणीने तिच्याच मैत्रिणीचे नग्न फोटो व्हायरल केलेत. पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने हे भयंकर कृत्य केलं आहे. महाविद्यालयीन तरुणीने तिच्या सोबत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचे अर्ध नग्न फोटो काढून मित्रांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल केलेत.

Nagar Crime News
Uttar Pradesh Crime News: 'घरी मी एकटाच आहे, तू ये...'; नकार मिळताच पोलीस आणि तरुणीमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, 23 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी पीडित तरुणीच्या मैत्रिणीसह ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणी पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. कोथरूड परिसरात फ्लॅट रेंटवर घेऊन त्या एकत्र राहत होत्या.

Nagar Crime News
Ahmednagar Crime News: अहमदनगर जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच! पट्ट्याने गळा आवळून अज्ञाताची हत्या; परिसरात खळबळ

दरम्यान, त्या रहात असलेल्या फ्लॅटवर आरोपी तरुणीचे मित्र अधून मधून येत असत. आरोपीने या मित्रांची ओळख फिर्यादी तरुणीसोबत करून दिली होती. तसेच त्यांच्यासोबत मैत्री करावी म्हणून ती फिर्यादी तरुणीच्या पाठीमागे तगादा लावत होती. मात्र फिर्यादी तरुणीने मैत्री करण्यास नकार दिला. यावरून त्या दोघीत वादही होत होते.

दरम्यान, काही दिवसानंतर आरोपी तरुणीने फिर्यादीचे खाजगी अर्धनग्न फोटो काढले आणि ती तिच्या मित्रांपैकी कोणालातरी पाठवले. त्यानंतर वेगवेगळी फेक इंस्टाग्राम अकाउंट काढून त्यावरून फिर्यादी तरुणीचे हे अर्धनग्न फोटो वारंवार व्हायरल केले गेले. हे सर्व अर्धनग्न फोटो फिर्यादीच्या कुटुंबीय आणि मित्र परिवारामध्ये गेले.

त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणीसह तिच्या मित्रांवर आणि दोन फेक अकाउंट धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.