Ganpati Visarjan 2023 : गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक करणा-या 15 समाजकंटकांवर गुन्हा दाखल

सध्या या गावात शांतता असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे.
Buldhana Crime News, Ganesh Visarjan
Buldhana Crime News, Ganesh VisarjanSaam tv
Published On

Ganesh Visarjan 2023 : कवठळ गावात गणेश विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केली हाेती. जो पर्यंत दगडफेक करणा-यांना अटक होत नाही तो पर्यंत गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेत विसर्जन मिरवणूक थांबविली हाेती. दरम्यान पाेलीसांनी 15 समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Buldhana Crime News, Ganesh Visarjan
Gondia News : जहाल नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण; ११ लाख रुपये प्रदान

बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक आणि विटांचा मारा केला होता. या दगडफेकेत चार गणेशभक्त जखमी झाले.

Buldhana Crime News, Ganesh Visarjan
Kokan Politics : इतकी घाई करू नका, इच्छा असेल तर बंधूंना भाजपात पाठवा; नितेश राणेंचा उदय सामंतांना सल्ला

त्यानंतर गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणूक जवळपास चार तास एकाच ठिकाणी थांबवून ठेवली तसेच समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली. पोलीस अधिकारी प्रमोद उलेमाले यांनी ग्रामस्थांची चर्चा करून विसर्जन शांततेत पार पाडलं.

या प्रकरणी पंधरा जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पाेलीसांनी दिली. सर्व संशयितांचा शाेघ घेतला जात आहे. सध्या या गावात शांतता असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Buldhana Crime News, Ganesh Visarjan
Rahata APMC : राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'फुल खरेदी -विक्री केंद्र' उभारणार : राधाकृष्ण विखे-पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com