Gondia News : जहाल नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण; ११ लाख रुपये प्रदान

नक्षल चळवळीतील बिकट परिस्थिती पाहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
Gondia
Gondiasaam tv

- शुभम देशमुख

Gondia Police News : नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया करण्यात तरबेज असलेला देवरी दलमचा नक्षल कमांडर याने पत्नीसह नुकतेच गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांना शासनाकडून ११ लाख रुपये प्रदान करण्यात आले. लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी असे नक्षलीचे नाव असून त्याच्यावर शासनाने १९ लाखांचे बक्षीस ठेवले होते. (Maharashtra News)

Gondia
Kolhapur Shetkari Sangh : पालकमंत्री, जिल्हाधिका-यांवर शेतकरी सहकारी संघाच्या सभासदांचा राेष, जागा ताब्यात घेतल्याने काढला माेर्चा

देवरी दलम कमांडर लच्छु उर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी हा सन 1999 पासून माओवादी संघटनेमध्ये भरती झाला. त्यांनतर त्याने अबुझमाड मध्ये प्रशिक्षण घेवून स्पेशल झोनल कमेटी मेंबर शेखर ऊर्फ सायण्णा याचे अंगरक्षक म्हणून काम केले.

Gondia
Pandharpur Ganesh Visrajan : चंद्रभागेच्या नदीपात्रात कुंडाची निर्मिती, प्रदूषण राेखण्यासाठी पंढरपूरात 14 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र

केशकाल दलम, कोंडगाव दलम (छट्टीसगड.), कोरची, खोब्रामेंढा (गडचिरोली) तसेच गोंदिया येथील देवरी दलम (महाराष्ट्र) मध्ये उप कमांडर या पदावर काम केले आहे. त्याने नक्षल दलममध्ये केलेले काम पाहून त्यास देवरी दलमकचे कमांडर पद देण्यात आले होते.

त्याचेविरुद्ध गोंदिया जिल्ह्यात चकमकीचे व जाळपोळीचे एकूण 6 गुन्हे नोंद आहेत. तर देवरी दल सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी ही सन 2001 मध्ये खोब्रामेंढा दलम मध्ये भरती झाली असून त्यानंतर तिला उत्तर बस्तर व बालाघाट (म. प्रदेश) च्या जंगलात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले.

Gondia
Ganeshotsav 2023 : चर्चा तर हाेणारच!कार्यकर्त्याचे लग्न हाेताच गणेशाेत्सव मंडळ देणार 10 हजार रुपये

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दलम सदस्य म्हणून कोरची, खोब्रामेंढा, चारभट्टी दलम, प्लाटून- ए (गडचिरोली), गोंदिया येथील देवरी दलम मध्ये काम केले आहे. तिचेविरुद्ध गोंदिया जिल्ह्यात मारहाण, पोलीस पार्टीवर फायरिंग, जाळपोळ असे एकूण 8 गुन्हे नोंद आहेत.

आत्मसमर्पण केल्यानंतर लच्छू उर्फ लक्ष्मण उर्फ सुखराम कुमेटी यांना महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत बक्षीस म्हणून ३ लाख रूपये व केंद्र शासनाच्या एस.आर.ई. योजने अंतर्गत २ लाख ५० हजार रुपये असे एकुण ५ लाख ५० हजार रुपये तर कमला उर्फ गौरी यांना ४ लाख ५० हजार रुपये, तसेच दोन्ही पती-पत्नी एकत्रित आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त १ लाख ५० हजार असे ११ लाख रुपये देण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com