चंद्रपूर : मुलांना दिल्या जाणाऱ्या खिचडीचा तांदूळ प्लास्टीकचा (Plastic Rice) असल्याच्या घटनेने सध्या एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पंचायत समिती (Chandrapur Panchayat Samiti) अंतर्गत घुग्गुस शहराजवळच्या उसगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून शासनातर्फे आलेले हे धान्य आहे.
या धान्यातील भात शिजवला असता त्यातील काही तांदळाचे दाणे शिजलेच नाहीत. त्यामुळे एकच गोंधळ आणि विविध तर्काना उधाण आले. याबाबत पालकांनी मंगळवारी सरपंच निविदा ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. ठाकरे यांनी लागलीच या प्रकाराची माहिती घेतल्यावर तक्रारीत सत्य आढळून आले. पौष्टिक आहारातील तांदूळ शीजला नाही, परंतु तो तव्यावर टाकला असता वितळू लागला. त्यामुळे तो प्लास्टिकचा तांदूळ असावा, अशी चर्चा उसगावमध्ये आहे.
पालकांची तक्रार आल्यावर या प्रकरणी पुरवठा विभागाकडे चौकशी केल्यावर 50 किलो तांदळात शासनातर्फे मिळालेला अडीच किलो पौष्टिक फोर्टीफाईड तांदूळ एकत्र केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. पण पालकांचे समाधान यामुळे अजूनही झालेले नाही. हा संपूर्ण प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याने विश्वास पालकांचा बसणे अवघड झाले आहे. त्यामुळेच हा तांदूळ (Rice) खरंच पौष्टिक आहे का, असा सवाल आता पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच निविदा ठाकरे यांनी केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.