लक्षात ठेवा.. सर्वांना पुरून उरेल रांगडा राष्ट्रवादीचा गडी; ED च्या कारवाईवर कोल्हेंच ट्विट

नबाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीने भाजप नेत्यांवर टिका केली आहे.
Amol Kolhe Tweer After Malik Arrest
Amol Kolhe Tweer After Malik ArrestSaam TV
Published On

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल असून त्यांची जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय. नबाब मलिकांना ED ने ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीने भाजप नेत्यांवर टिका केली आहे.

अशातच आता खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सत्तेच्या मोहासाठी भाजप ईडीची शिडी लावतं आहे, धाडी घालत आहे. आणि म्हणून कमळाबाई काडी लावत आहे अशा आशयाची कविता त्यांनी ट्विट केली आहे.

सत्तेच्या माडीसाठी, ईडीची शिडी

विनाकारण मारी, धाडीवर धाडी

सलते सत्तेवरील, महा-आघाडी

म्हणून कमळाबाई, ती लाविते काडी

तपासयंत्रणा झाल्या, कमळीच्या सालगडी

पाकळ्यांमध्ये नाहीत का, काहीच भानगडी?

पण लक्षात ठेवा... पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी असं ट्वीट करत त्यांनी नवाब मलिकांच समर्थन केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com