Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv

Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार मुलींची सुटका

Pimpri Chinchwad News : गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत कारवाई
Published on

पिंपरी चिंचवड : हिंजवडी भागातील स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची (Pimpri Chinchwad) माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक कक्ष पोलीसांनी (Police) धाड टाकत पर्दाफाश केला आहे. तसेच या कारवाईत स्पा सेंटरमधुन देहविक्री करणाऱ्या चार पीडित मुलींची सुटका केली आहे.

Pimpri Chinchwad News
Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी (Hinjwadi) पोलीस स्टेशन हद्दीतील द स्टेलर कॉम्प्लेक्समधील ऑफिस नंबर ३०२ या ठिकाणी द विदा स्पाच्या नावाखाली काही दलाल सेक्स रॅकेट चालवत आहेत. याबाबतची गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली.

Pimpri Chinchwad News
Girish Mahajan News : त्यानंतरच खडसेंनी भाजपचा प्रचार करावा; मंत्री गिरीश महाजन

तिघांवर गुन्हा दाखल 

पोलिसांनी स्पा सेंटरमधुन देहविक्री करणाऱ्या चार पीडित मुलींची सुटका केली आहे. तसेच स्पा मॅनेजर ऋषिकेश मुकेश निकाळजे, स्पा सेंटर मालक गणेश राजाराम घेवडे आणि रितेश या तिन जणांविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com