'डॉक्टर महिलेची हॉटेलवर बोलवून हत्या', फलटण प्रकरणात नवा खळबळजनक दावा

Phaltan Woman Doctor Death Mystery: फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या असा संशय व्यक्त केला जातोय.. मात्र हा संशय कुणी व्यक्त केलाय? आणि महिला डॉक्टरच्या हत्येच्या दाव्यानंतर कसं राजकारण तापलंय?
Thackeray Sena leader Sushma Andhare alleges Phaltan woman doctor was murdered, sparking a major political row in Maharashtra.
Thackeray Sena leader Sushma Andhare alleges Phaltan woman doctor was murdered, sparking a major political row in Maharashtra.Saam Tv
Published On

ऐकलंत.... फलटणधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आलाय.. कारण महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोपच ठाकरेसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय.. मात्र या आरोपामागे आधार आहे तो महिला डॉक्टरच्या बहिणीने केलेल्या दाव्याचा...

आता सुषमा अंधारे महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करुन थांबल्या नाहीत... तर त्यांनी SIT वर विश्वास नाही म्हणत उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी केलीय..

खरंतर 23 ऑक्टोबरला प्रशासन आणि राजकारण्यांच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.. त्यात गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचा उल्लेख करण्यात आला.. मात्र महिला डॉक्टरने पोलीस उप अधीक्षक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडे वारंवार तक्रार करुनही त्याची दखल का घेतली नाही? याचा तपास करुन वरिष्ठ डॉक्टरांसह आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे..

मात्र आता या प्रकरणात अंधारेंच्या मागणी प्रमाणे उच्च न्यायालय सुमोटो दाखल करुन न्यायमुर्तींच्या मार्फत चौकशी करणार का? आणि महिला डॉक्टरच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांना फासावर पोहोचवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com