नाल्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून तरुणाने परत आणलं, थरारक क्षण सीसीटीव्हीत कैद

Parbhani Youth Saves Schoolboy From Drain Cctv Rescue: परभणीतील शांती निकेतन कॉलनीत पावसामुळे साचलेल्या पाण्यात नाल्यात वाहून जाणाऱ्या शाळकरी मुलाला स्वप्नील कदम या तरुणाने धाडसाने वाचवले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
A young man rescues a schoolboy being swept away in floodwater in Parbhani; the dramatic moment was captured on CCTV.
A young man rescues a schoolboy being swept away in floodwater in Parbhani; the dramatic moment was captured on CCTV.saam tv
Published On

परभणी शहरातील शांति निकेतन कॉलनी भागातील आरोग्य रुग्णालयाच्या समोर काल झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचले होते. त्यातच या भागात नाल्या नसल्याने रस्त्याच्या चारही बाजूने पाणी साचते. याच साचलेल्या पाण्यात नाल्यात एक शाळकरी मुलगा आपल्या सायकलसह वाहून जात होता. अक्षरशः या पाण्यात तो बुडाला होता. मात्र सुदैवाने पाणी कमी होण्याची वाट पाहणाऱ्या स्वप्नील कदम या तरुणाने ही घटना पाहिली आणि तात्काळ धाव घेत या बुडलेल्या चिमुकल्याला बाहेर सुखरूप काढले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून प्रसंगावधान राखत तात्काळ या चिमुकल्याला वाचवणाऱ्या स्वप्नील कदम या तरुणाचे ही परभणीकरांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.

A young man rescues a schoolboy being swept away in floodwater in Parbhani; the dramatic moment was captured on CCTV.
MLA Disqualification Case Maharashtra | आमदार अपात्रतेचा निर्णय वेळेआधीच लागणार-सूत्र

हिंगोलीतील चांगेफळ शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील चांगेफळ शिवारामध्ये ढगफुटी झाली आहे. तब्बल एक तास मुसळधार पाऊस कोसळल्याने या परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आहेत, तर ढगफुटी झाल्याने या शिवारातील शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तब्बल पाच दिवस पेरण्या खोळंबणार आहेत.

A young man rescues a schoolboy being swept away in floodwater in Parbhani; the dramatic moment was captured on CCTV.
ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट

हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आजपासून पुढील तीन तासात रायगडसह पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com