Sanjay Raut: “२०२९ पर्यंतची गॅरंटी कोण देणार? शिंदे तरी राहतील का?” संजय राऊतांची जोरदार टीका

Shiv Sena split: महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षांतरानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. निधी वापर, निवडणूक वाद आणि राजकीय स्थैर्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv
Published On

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष नव्या घडामोडींमुळे अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटातील काही नेत्यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर काही तासांतच गोकुळ गीते यांना ‘विकत घेऊन’ पक्षात सामील करून घेतले गेले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
Relationship Advice: लग्न झाल्यानंतर या 5 गोष्टी व्यक्त करताना सावध राहा, नात्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

राऊत यांनी पुढे बोलताना राज्यातील सध्याच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “२०२९ पर्यंतची गॅरंटी कोण देणार? शिंदे तरी राहतील का? पुलाखालून अजून बरंच पाणी वाहून जाईल,” असा थेट सवाल करत त्यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीवर टिप्पणी केली.

ते म्हणाले की, सध्या काही नेते सन्मान आणि विकासाच्या मुद्द्यावर पक्ष बदलत असल्याचं सांगतात, मात्र प्रत्यक्षात निधी आणि राजकीय फायद्यांसाठीच हे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मिळालेला निधी योग्य प्रकारे वापरला गेला नाही, असे आकडे समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.

Sanjay Raut
Cabinet Meeting: मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीदरम्यान फडणवीस सरकारने घेतले ४ मोठे निर्णय, कुणाला होणार सर्वाधिक फायदा?

संजय राऊत यांनी निधी वाटप आणि विकास कामांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत काही प्रकरणांमध्ये निधीचा वापर ठेकेदारीपुरता मर्यादित राहिल्याचं म्हटलंय. तसंच शिंदे गटातील एका नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी समाजकारणाच्या उद्देशाने वृद्धाश्रम आणि पाळणाघर सुरू केल्याचा उल्लेख करत, “मातोश्री” मधून अनेकांचे पालनपोषण झाल्याचे राऊत यांनी सांगितलं.

Sanjay Raut
फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! मेन्टेनन्सची कटकट संपणार; राज्य सरकारचा नवा ऐतिहासिक नियम तयार

नांदेडमधील एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी शिंदे गटावर पुन्हा निशाणा साधला. “तेरा तारखेला खोके, चौदा तारखेला खोके, नंतर पंचवीस खोके” अशा स्वरूपाचे आरोप करत काही आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच उमेदवारीवरून झालेल्या वादात राजीनाम्याची धमकी दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com