Parbhani News: रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू; गंगाखेडमधील दुर्देवी घटना

कोणी सदरील व्यक्तीला ओळखत असेल तर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Parbhani News
Parbhani NewsSaamtv
Published On: 

चेतन काटकर, परभणी

Parbhani Gangakhed News: रेल्वे खाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या गंगाखेड शहरातील भगवती नगर परिसरामध्ये घडली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

Parbhani News
Kalyan Railway Station News : कल्याण रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळाबाजार ? प्रवाशांना मारहाण, सुसाट टोळीला मनसेचा इशारा

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे खाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परभणीच्या गंगाखेड शहरातील भगवती नगर परिसरामध्ये ही घडली आहे. सदरील व्यक्ती रेल्वेखाली सापडल्यानंतर त्याचा श्वास सुरू असल्यामुळे त्याला उचलून रेल्वे स्थानकापर्यंत नेले मात्र रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्दा नोंद करण्यात आला असून या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. कोणी सदरील व्यक्तीला ओळखत असेल तर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Parbhani News
Social Media त आक्षेपार्ह पाेस्ट, युवक पाेलिसांच्या ताब्यात; कसबे डिग्रजला कडकडीत बंद

बेरोजगारीमुळे केली चोरी....

कल्याण रेल्वे स्थानकात महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ (Kalyan) अटक केली आहे. रोशन पाटील असे या चोरट्याचे नाव आहे. रोशन हा बेरोजगार होता. काम मिळत नसल्याने तो कर्जबाजारी झाला यातूनच त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलीस (Police) तपासात निष्पन्न झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.