Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Hanuman Temple Sabha Mandap: परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Hanuman Temple Sabha Mandap
PARBHANI TEMPLE TRAGEDY: 5 DEAD, 17 INJURED AS HANUMAN TEMPLE SABHA MANDAP COLLAPSES; ₹5 LAKH AID ANNOUNCEDSaam tv
Published On
Summary
  • परभणीच्या यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली.

  • या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहे. यशवाडी येथील दुर्घटनेतील मृतांची नावे समोर आली असून शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Hanuman Temple Sabha Mandap
MLC Election : परभणी-हिंगोलीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला, श्रीकांत शिंदेंच्या विश्वासूला संधी; नेमकं गणित काय?

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. येथे भाविकांची गर्दी मोठी असते. आज शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला आले होते. सभा मंडप कोसळला. या दुर्घटनेत५ जणांचा मृत्यू झाला. तर १७ जण जखमी झालेत. सभा मंडपाच्या मलब्याखाली एकूण २३ जण दबल्याची माहिती मिळाली होती.

Hanuman Temple Sabha Mandap
Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

यशवाडी येथील दुर्घटनेतील जखमींची नावे :-

1) दादाराव रानोजी भांगे, मो.क्र.9146859793

2) रामकृष्ण नागोराव बादाडे,

3) परमेश्वर पुंडलिक राऊत,

४) सौरभ गजानन कोथाळकर,

५) केशव गिरी,

६) प्रवीण रघुनाथ हलगे,

७) गणेश ईकर,

८) ओमकार मारुती कोपरकर,

९) रामेश्वर रामकिशन गोंडे,

१०) रामा वेंकटराव होगे,

११) अनिकेत संतोष गडदे,

१२) हनुमंत लिपणे,

१३) प्रवीण प्रकाश राजबिंडे,

१४) नारायण दौलत खरात,

१५) ऋषिकेश कोपरटकर,

१६) श्रीकृष्ण रुस्तुम भोसले वय १० वर्षे अंदाजे, रा. कुंभारी, ता. जि.परभणी

17) अभिषेक कृष्णा वाघमारे वय 19 वर्ष रा केकरजवळा ता. मानवत (जखमी)

18) भरत रामचंद्र कळसाईतकर वय 20 रा. मांडाखळी ता.परभणी

मृतांची नावे

1) संतोष सर्जेराव गडदे, रा. गडदे पांगरा ता. मंठा (मयत),

2) आकाश सुरदुसे, परभणी (मयत),

3) मुनेश रामबिलास अग्रवाल वय 26 वर्षे रा.जिंतूर जि.परभणी (मयत)

4) सुरज बाबासाहेब पोपटकर वय 20 वर्षे रा इटोळी ता.मानवत जि.परभणी (मयत)

5) एक अनोळखी मयत वय अंदाजे 45 वर्षे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com