Parbhani News: कॉलेजची फी भरायला नव्हते पैसे; १७ वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

Parbhani News: परभणीत १७ वर्षीय विद्यार्थ्याने कॉलेजची फी भरायला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Parbhani Crime News
Parbhani Crime NewsSaam tv
Published On

Parbhani Crime News:

परभणीतून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. परभणीत १७ वर्षीय विद्यार्थ्याने कॉलेजची फी भरायला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीतील औंढा तालुक्यातील दौंडगावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणाच्या निर्णयाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात शैक्षणिक घेत असताना घरची हलाखी होती. त्यात महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्याकडे सतत शैक्षणिक शुल्काचा तगादा लावला होते. महाविद्यालय शैक्षणिक शुल्कासाठी सतत तगादा लावत असल्याने या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

परभणी जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील दौंडगाव ही घटना घडली आहे. या घटनेनंतर या विद्यार्थ्याने उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani Crime News
Washim Crime News : तहसिलदारांची धडक कारवाई, ट्रकसह 6 लाखांचा तांदुळ पकडला

शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

संभाजीनगर येथे अकरावीत वाणिज्य शाखेत शिक्षण परमेश्वर विठ्ठल चितरे (वय 17) या विद्यार्थ्याने औंढा तालुक्यातील दौडगाव महाविद्यालयात शिक्षण घेत होता. महाविद्यालयाची फी नसल्याने त्याने स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Parbhani Crime News
Teachers Protest News: शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? शिक्षण मंत्री संपतापले

१७ वर्षीय विद्यार्थी हा मागील वर्षभरापासून संभाजीनगर येथे एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. त्याने शिक्षणासाठी वडिलांकडे महाविद्यालयाची शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, त्यावेळी वडिलांची हालाखीची परिस्थिती असल्याने सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फी भरू असे वडिलांनी आश्वासन दिले. परंतु महाविद्यालयाने फीसाठी तगादा असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com