Washim Crime News : तहसिलदारांची धडक कारवाई, ट्रकसह 6 लाखांचा तांदुळ पकडला

या घटनेमुळे रिसोड तालुक्यात तांदळाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब अधोरेखित होत आहे.
Washim,  ration rice
Washim, ration ricesaam tv
Published On

- मनोज जयस्वाल

Washim Crime News : काळ्या बाजारात जाणारा लाखो रुपयांचा रेशन तांदूळ धाड टाकून पकडण्यात आला आहे. ही कारवाई वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसीलदार यांनी रिसोड शहरातील महात्मा फुले नगर येथे केली. दरम्यान ट्रक चालकाचा शाेध पाेलीस घेताहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Washim,  ration rice
Political News : 'नितेश राणेंना अक्कल नाही, आम्हांला शहाणपण शिकवू नये'

या तपासणी वेळी गाडीत सरासरी अदांजे 510 तांदळाचे कटटे असल्याचे आढळुन आले आहे. या गाडीतील तांदुळ, धान्याची पाहणी केली असता प्रथम दर्शनी हा तांदुळ स्वस्तधान्य दुकानातुन (रेशन दुकान) वाटप करण्यात येणाऱ्या रेशनचा असल्याचे निदर्शनास आले आहे. (Maharashtra News)

या तांदळाची किंमत अंदाजे 6 लाख 25 हजार रुपये व ट्रकची किंमत अंदाजे दहा लाख असा एकुण 16 लाख 25 हजारांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणात जीवनावश्यक वस्तु अधिनियम कायदा 1955 नुसार गाडीचे चालक व मालक यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Washim,  ration rice
Political News : भाजप जिल्हाध्यक्षांच्या नाराजीतून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com