Anil Parab
Anil ParabSaam tv

Anil Parab Statement: जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते : अनिल परब

Pandharpur News : जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते; अनिल परब यांनी असं म्हटलं आहे.
Published on

पंढरपूर : जरांगे पाटील यांचे उपोषण हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नव्हते. तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी आहे; असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आज (Pandharpur) पंढरपुरात केला. अनिल परब (Anil Parab) यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Anil Parab
Saptasrhungi Gad: सप्तशृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; गडावरील रोपवे दोन दिवसांसाठी बंद

विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी अनिल परब आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वंशवळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे (Maratha Aarkshan) अशी त्यांनी मागणी केली. सामाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध झाले पाहिजे. इम्परिकल डाटा जमा झाला पाहिजे. त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. कुणबी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप ही अनिल परब यांनी केला.

Anil Parab
Beed News : झोपेतून उठताच दिसले भयानक दृश्य; अनेक ठिकाणी हळदी..कुंकू..लिंबू टाकून पूजा, गावात भीती

सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हे सरकार जाते की राहते हे पाहावे लागेल. निवडणुका घ्याव्या लागतील की नवा पर्याय शोधावा लागेल. राष्ट्रवादीमधील फूट हा त्यावरील पर्याय भाजपकडून असू शकतो असे ही  परब म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com