Pandharpur Temple: विठ्ठल-रुक्मिणीचे 'पदस्पर्श दर्शन' तब्बल दीड महिना राहणार बंद; नेमकं काय आहे कारण?

Pandharpur Breaking News: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सुमारे दीड महिना पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.
Pandharpur Vitthal Temple
Pandharpur Vitthal TempleSaam tv
Published On

Pandharpur Vitthal Rukmini Temple

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सुमारे दीड महिना पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Pandharpur Vitthal Temple
Shirdi Politics: लोकसभेच्या तिकीटावरून शिंदे गटात वाद उफाळला; अनेक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

दररोज मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur News) येत असतात. विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श व्हावे, अशी भाविकांची इच्छा असते. यासाठी ते तासंनतास रांगेत उभे राहतात. सद्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता देवाच्या गर्भगृहातील काम सुरू करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे सुमारे दीड महिना पदस्पर्श दर्शन बंद ठेवावे लागणार आहे. यासंदर्भात आज मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (latest Marathi News)

त्यानुसार, येत्या १५ मार्चपासून सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. दरम्यान दररोजचे देवाचे नित्य उपचार सुरू राहणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी तसेच सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलंय.

Pandharpur Vitthal Temple
Navneet Rana: राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदान्या? आदिवासी महिलांनी व्यक्त केला संताप, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com