Shirdi Politics: लोकसभेच्या तिकीटावरून शिंदे गटात वाद उफाळला; अनेक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Shirdi Breaking News: लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.
Shirdi Politics News
Shirdi Politics NewsSaam TV
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही शिर्डी

Eknath Shinde Group Shirdi News

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलंय. याच नाराजीतून शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिर्डीत शिंदे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirdi Politics News
Breaking News: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप; बड्या पक्षाने सोडली भाजपची साथ

गेल्या १० वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको, अशी भुमिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघात कोणतेही ठोस कामे केली नाहीत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं, असा सवालही पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. (Loksabha Election 2024)

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज शिर्डी येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत सदाशिव लोखंडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामे दिले आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे पदाधिकारी विजय जगताप यांनी दिली आहे. (latest Marathi News)

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजवरची निवडणूक कधीही विकासाच्या मुद्यावर झाली नाही. केवळ जातीय समीकरण आणि पक्षबदलामुळे झालेली नाराजी यातून लोखंडे दोनदा खासदार झाले. मात्र, शिर्डीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याची खंत शिंदे गटाचे पदाधिकारी शरहप्रमुख रामपाल पांडे आणि पदाधिकारी सुभाष उपाध्ये यांनी बोलून दाखवली आहे.

दुसरीकडे मतदारसंघातील जनताही लोखंडे यांच्यावर नाराज आहे त्यामुळे त्यांना परत उमेदवारी दिली तर पराभवाला सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे हि जागा भाजपला द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांची डोकेदुखी वाढली असून महायुती शिर्डीच्या जागेबाबत काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Shirdi Politics News
Navneet Rana: राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदान्या? आदिवासी महिलांनी व्यक्त केला संताप, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com