Breaking News: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप; बड्या पक्षाने सोडली भाजपची साथ

Haryana Politics News: लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी (जननायक जनता पक्ष) पक्षाची युती तुटली आहे. जेजेपीचे प्रमुख आदुष्यंत चौटाला यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीत यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
pm narendra modi and amit shah
pm narendra modi and amit shahSaam tv
Published On

BJP-JJP Alliance Broke

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने अनेक जुन्या मित्रपक्षांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. निवडणुकीत भाजपने ३७० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर "अब की पार एनडीए ४०० पार", असा नारा देखील दिला आहे. अशातच लोकसभेपूर्वी भाजपला तगडा झटका बसलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या भाजपचे आमदार राज्यपालांची भेट घेण्यासाठी विधानभवनात पोहचले असून दुपारपर्यंत नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होऊ शकते. या सर्व घडामोडीनंतर अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा घेऊन भाजप पुन्हा एकदा हरियाणात नवीन सरकार स्थापन करू शकतं. (Loksabha Election 2024)

हरियाणामध्‍ये ऑक्‍टोबर २०१९ मध्‍ये विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४० जागांवर विजय मिळवला होता. मात्र, बहुमतापासून भाजपला वंचित राहावं लागलं होतं. अखेर भाजपने १० आमदारांचे संख्‍याबळ असणार्‍या दुष्‍यंत चौटाला यांच्‍या जननायक जनता पक्षाबरोबर युती केली. (latest Marathi News)

pm narendra modi and amit shah
Navneet Rana: राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदान्या? आदिवासी महिलांनी व्यक्त केला संताप, पाहा VIDEO

भाजपकडून मोहनलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुष्‍यंत चौटाला उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र, लोकसभा जागावाटपात दोन्ही पक्षांमध्ये एकमत नव्हतं. हरियाणात लोकसभेच्या १० जागा असून या जागांवर आम्हीच सर्व उमेदवार उभे करणार, असं भाजपच्या वतीने जेजेपीला सांगण्यात आलं.

पण जेजेपीने १० पैकी २ जागांची मागणी भाजपकडे केली होती. पण भाजपने जेजेपीला जागा सोडण्यास नकार दिला होता. यानंतर दुष्यंत चौटाला यांनी थेट दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दिल्लीतही जागावाटपावर समाधान न झाल्याने अखेर चौटाला यांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे हरियाणातील भाजपचे बहुमत कमी झाले. परिणामी मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भाजपचे सरकार कोसळले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com