

पंढरपूरमध्ये अॅसिडसदृश हल्ल्याने खळबळ
दुचाकीवरून आलेल्या दोघांचा हल्ला
तरुणी गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार
भारत नागणे, साम प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली होती. आता पंढरपूर शहरातील एका २८ वर्षीय तरुणीवर अॅसिड झाला आहे. या घटनेने पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरपालिका परिसरात परिसरात घडली आहे. जखमी तरुणीला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैष्णवी भागवत असे या पीडित तरुणीचे नाव आहे.
जखमी तरूणी भेळ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. रस्त्याने जात जात असताना नगरपालिका इमारतीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तिच्या चेहऱ्यावर अॅसिड सदृश्य रसायन टाकले. त्यानंतर भयभीत झालेल्या तरूणीने बाजार पेठेतील एका दुकानदाराच्या मोबाईल फोनवरुन घडला प्रकार घरच्यांना सांगितला.
त्यानंतर तिला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये तरूणीच्या चेऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तरूणीची प्रकृतीस्थीर असली तरी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान रुग्णालयात पोलीस कर्मचारी दाखल झाले असून ते पीडितेच्या आईचा जबाब नोंदवत आहेत.
दरम्यान आम्हाला एक फोन आला होता, तेव्हा आम्ही पेट्रोल पंपाजवळ आमची मुलगी सापडली. तेथे माझ्या मुलीवर अॅसिडसारखा पदार्थ टाकल्या समजलं. माझ्या मुलीवर टाकला तसा कुणावरही अॅसिड टाकू नका, असं भावनिक आवाहन पीडित मुलीच्या आईने केलं आहे. पंढरपुरात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असताना दुसरीकडे शहरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे धनगर समाजातील मेंढपाळसहित महिलेला काठीने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मेंढपाळ हे बारामती तालुक्यातील असल्याची माहिती आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.