कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

Onion Farmers Protest Maharashtra Highway Block Msp Demand: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारलाय... कांद्याला हमीभाव द्या, असी मागणी करत शेतकरी थेट रस्त्यावर उतरलेत... त्यामुळे राज्यात कांदा उत्पादक शेतकरी कसा हवालदिल झालाय... कवडीमुळे दरामुळे शेतकऱ्याचं जगणं कसं महागलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Angry onion farmers block highway and dump produce on road during protest over falling prices in Maharashtra.
Angry onion farmers block highway and dump produce on road during protest over falling prices in Maharashtra.saam tv
Published On

कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं आणि उत्पादन खर्चही निघत नसल्यानं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालाय...पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला.बैलगाड्या आणि डोक्यावर मागण्यांची पाटी घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. इतकचं काय तर शेतकऱ्यांनी थेट महामार्गावरच कांदा फेकून सरकारचा तीव्र निषेध केला.

कांद्याच्या या आंदोलनात विरोधी पक्षांची एकी दिसून आली. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यही कांद्याची माळ घालून रस्त्यावर ठिय्या मांडून होते. या मुद्यावर विरोधकच नव्हे तर सत्ताधारी आमदार आंदोलनात पुढे होते. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकरेंनीही सरकारला घरचा आहेर दिला...

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

- कांद्याला 25 रुपये हमी भाव द्या

- आधीच्या कांद्याला 15 ते 20 रुपये अनुदान द्या

- राज्यात नाफेडकडून कांदा खरेदी करा

- व्यापाऱ्यांना नाफेड खरेदीचा लाभ होऊ द्या

- केंद्रानं किमान 10 लाख टन कांदा खरेदी करावा

- आंध्राप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्या

- निर्यात धोरणात सुधारणा करा

- कांदा खरेदी धोरण शेतकरी हिताचं असावं

मुख्यमंत्र्यांनी जरी एक क्विंटल कांद्याला 1580 रुपये भाव देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. कांदा हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नेहमीच कळीचा आणि संवेदनशील मुद्दा राहिलाय. मात्र कांद्याला 50 पैसे आणि 1 रुपये दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चांगलात उद्रेक झालाय...मंचरमध्ये लागलेली ही ठिणगी येत्या काळात संपूर्ण राज्यभर पसरण्याची शक्यता निर्माण झालीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com