Beed News: मित्रच निघाला शत्रू! अपहरण करून मागितली 20 लाखांची खंडणी; गुन्हा दाखल...

Crime News: अवघ्या 4 तासात पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या बहाद्दरांच्या आवळल्या मुसक्या
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

Beed Crime News: बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघा मित्रांनी एका जुन्या मित्राचे अपहरण करून, त्याच्या डोक्याला पिस्तुल लावून 20 लाखांची खंडणी मागितली. विशेष म्हणजे यावेळी त्या तरुणाला दोघा मित्रांनी रॉडने जबर मारहाण देखील केली.

जय विशाल हजारी असं अपहरण करून, खंडणीसाठी मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मनीष प्रकाश क्षीरसागर आणि शैलेश संतोष गिरी असं खंडणी बहाद्दर मित्रांचे नाव आहे. (Latest Marathi News)

Beed News
Ashish Deshmukh Statement: राहुल गांधींना 'ती' ऐतिहासिक चूक दुरुस्त करता आली असती, काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर आशिष देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

आरोपी मनीष आणि शैलेश या दोघांनी काल सायंकाळी जय हजारी याला घराबाहेर बोलावून घेतले. तेथून गाडीवर बसवून त्याला धानोरा रोड भागात नेले. त्या ठिकाणी गेल्यावर या दोघांनी जयला लोखंडी रॉडने मारहाण करत, डोक्याला पिस्तुल लावून, 20 लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. (Beed News)

Beed News
Mumbai Trans Harbour Link : असा असेल मुंबईचा सागरी सेतू... वैशिष्ट्ये आणि फायदे

मात्र जयने यावेळी दोघांच्या तावडीतून आपली सुटका करून घेत घर गाठले आणि घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तातडीने पोलिसात (Police) तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच अवघ्या 4 तासात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मनीष आणि शैलेश या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तुल आणि रॉड जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या (Beed) शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com