ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

Omraje Nimbalkar Loses 15000 Followers Defection Row: ठाकरेसेनेतील 6 खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, या फुटीचा सर्वाधिक फटका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना बसताना पाहायला मिळतोय. त्यामुळे ओमराजेंनी वेळीस सावध होऊन आपला शिंदेसेनेतील प्रवेश वेटिंगवर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये. पाहा यावरचा हा रिपोर्ट...
Omraje Nimbalkar faces social media backlash as thousands unfollow him amid defection speculation.
Omraje Nimbalkar faces social media backlash as thousands unfollow him amid defection speculation.Saam tv
Published On

धाराशिवचे ठाकरेसेनेचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनतर आता सोशल मीडियावर ओमराजेंना अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झालाय. अवघ्या दोन दिवसांत तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्सनी ओमराजेंना अनफॉलो केलंय. इतकंच नव्हे तर ही संख्या पुढील दिवसांत आणखी घटण्याची चिन्हे आहेत. मात्र, सोशल मीडियावरील ओमराजेंच्या पोस्टखाली समर्थकांकडून ट्रोलिंग केलं जातंय. त्यातल्या काही प्रतिक्रिया पाहूयात...

ओमराजेंची सोशल मीडियावर ट्रोलिंग

'तुमच्या विषयी आदर होता...तो संपला!'

'परंतु तुझ्यासारखा गद्दार पाहिला नाही!'

'जे नेहमी निष्ठेचा दिंडोरा पिटतात तेच गद्दारी करण्यात सर्वात पुढे असतात'

'तुम्ही जायला नव्हते हवे होते साहेब'

'दादा हे काय केलत तुम्ही, हे शोभत नाही तुम्हाला, आपल्या धाराशिवकरांचा अपमान केला'

दरम्यान, ठाकरेसेनेला धक्का देत शिंदेसेनेच्या वाटेवर असलेल्या ओमराजेंनी आता सावध भूमिका घेतलीये. स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या पत्रावर मी सही केलेली नाही, अशी माहिती ओमराजेंनी साम टीव्हीशी बोलताना दिलीये.

मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक विचार केल्यास हे पाऊल चुकीचं वाटतं. पण राजकीय विचार केला तर तेच बरोबर वाटू शकतं. शिंदेसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे. 20 जूनला माझ्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणारेय. त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेईन

तर दुसरीकडे, बंडखोरी केलेल्या ओमराजे निंबाळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे असल्याचं बोललं जातंय. धाराशिवमधील पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार, पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीये. या बैठकीत बंडखोर खासदार ओमराजेंविरोधात रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात बंडखोर ओमराजे निंबाळकरांसमोर ठाकरेसेनेचं मोठं आव्हान असणार आहे. या आव्हानाला ओमराजे निंबाळकर कसे सामोरे जातात, याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com