OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आणखी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

OBC-Maratha Reservation Row: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलंय. मराठा समाजाच्या मोर्चानंतर आता ओबीसी कार्यकर्ते नागपूरमध्ये आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन नागपूरमध्ये होणार असल्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन मिटवण्याचं आव्हान असेल.
OBC-Maratha Reservation R
OBC-Maratha Reservation Rosaam tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये ओबीसी-मराठा आरक्षणासाठी भव्य मोर्चा काढला जाणार.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर नवं राजकीय आव्हान उभं राहिलं.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आरक्षणासाठी लढा सुरू.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही आणखी एक मोठं आव्हान उभं राहणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. सरसकट समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा,अशा मागण्या घेऊन भगवं वादळ मुंबईत धडकलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात हे भव्य आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनामुळे सरकार अडचणीत आलं होतं. परंतु मुख्यमंत्री फडवणीसांनी चाणाक्षपणे मराठा आंदोलन शांत शांत केलं. परंतु आता फडणवीसांसमोर दुसरे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मराठा बांधवांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी बांधव मुख्यमंत्री भाजपवर नाराज झालेत. यावेळी ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनचा एल्गार उगारलाय. नागपूरमध्ये आंदोलन केलं जाणार असून मुख्यमंत्री हे आंदोलन कशाप्रकारे हाताळणार हे पाहणं औत्सुक्यांच ठरणार आहे.

मुंबईत धडकलेल्या हजारो मराठा आंदोलकांना शांतपणे परत पाठविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपकडून कौतुक झाले. परंतु आता त्यांच्या शहरात ओबीसी कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. आरक्षणासाठी ओबीसी नेते न्यायालयासह रस्त्यावर सुद्धा लढा देणार आहेत. आज नागपूरमध्ये ओबीसी नेते कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याची बैठक झाली. याबैठकीत काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार देखील उपस्थित होते.

OBC-Maratha Reservation R
Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

बैठक झाल्यानंतर विजय वडेवट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विदर्भातील ओबीसी चळवळीतील नेते कार्यकर्ते, पदाधिकारी आजच्या बैठकीत आले होते. पूर्वी पहिल्या जीआरमध्ये पात्र शब्द होता. दुसऱ्या जीआरमधून पात्र शब्द काढण्यात आला. हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे OBC समाजात नाराजी आहे. येत्या १२ तारखेला आम्ही एक कमिटी नेमणार असल्याची माहिती वडेवट्टीवार यांनी दिली.

OBC-Maratha Reservation R
Mumbai Protest: मुंबईतील आंदोलनावर बंदी आणा; शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आमची न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी आहे. नागपुरात मोठा मोर्चा काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहितीही विजय वडेवट्टीवार यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील जे कोणी न्यायालयात जातील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू, विदर्भातील वकील संघटना न्यायालयात जाण्यासाठी तयार आहे. कोणाला ओबीसी समाजाचं नुकसान नाही असे वाटत असेल. कोणीही सत्ताधारी यांचं मागलिकत्व स्वीकारत असेल तर जनता त्याचं समाचार घेईल, असा इशाराही विजय वडेवट्टीवार यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com