Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास

Dhule Nursing Student Death: धुळ्यामध्ये निर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वसतीगृहाच्या शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला.
Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास
Dhule Nursing Student DeathSaam RTv
Published On

Summary:

  • धुळ्यामध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली

  • वसतीगृहातील शौचालयात या विद्यार्थिनीने गळफास घेतला

  • विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे

  • पिंपळनेर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्याच्या पिंपळनेर शहरात ही घटना घडली. वसतीगृहाच्या शौचालयात या विद्यार्थिनीने गळफास घेत आयुष्य संपलं. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागचं कारण समोर आलं नाही. घटनेची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पिंपळनेर शहरातील एकलव्य शासकीय वसतीगृहात ही घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थिनीने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी नर्सिंगच्या पहिल्या वर्षासाठी शिक्षण घेत होती.

Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास
Shocking : "मी मेल्यांनंतर माझी कोणी आठवण काढू नका..." सोशल मीडियावर स्टोरी टाकत १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या, धक्कदायक कारण आलं समोर

आत्महत्या केलेली विद्यार्थिनी नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील अस्तंबा गावातील रहिवासी होती. तिच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

तसंच पोलिसांनी विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे वृत्त कुटुंबीयांना सांगितले आणि त्यांना बोलावून घेतलं. तिने आत्महत्या का केली याचे कारण समोर आले. तसंच पोलिसांना घटनास्थळावर सुसाईट नोट देखील सापडली नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास
Shocking: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या, गावात राहणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य; नाशिक हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com