राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ऐतिहासिक निर्णय! कौमार्य चाचणी घेण्याचा अधिकार कुणालाच नाही

देशभरातील जातपंचायतींना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने धक्का देत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
virginity test unscientific
virginity test unscientific Saam Tv
Published On: 

नाशिक: देशभरातील जातपंचायतींना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने धक्का देत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्त्री कुमारी आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही असं निर्णयात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या निर्णयामुळे कौमार्य चाचणीची मागणी करणाऱ्यांना चाप बसला आहे. (Virginity Test Unscientific)

हा एतिहासिक निर्णय आहे. गेल्या काही वर्षापासून हा मुद्दा उपस्थित केला जात होता. ही चाचणी अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात अन्याय सुरू होता.

virginity test unscientific
मायानगरी मुंबईत गटारी अमावस्येपूर्वी केली जाते रेल्वे रुळांची पूजा, धक्कादायक कारण उघड

न्यायालयालाही (Court) ते पटवून दिले जाणार आहे. नुकताच हा ऐतिहासिक निर्णय झाल्याचे कौमार्य चाचणी विरोधी लढणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त कृष्णा चांदगुडे (Krishna Chandgude) यांनी ही माहिती दिली.

virginity test unscientific
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धा खेळणार नाही ! नीरज चाेप्रानं केलं जाहीर; जाणून घ्या कारण

महाराष्ट्रात काही समाजात जात पंचायतीच्या माध्यमातून कौमार्य चाचणी घेतली जाते. काही प्रकरणात न्यायालयही चाचणी घेण्याचे आदेश देत असते. राज्यातील आरोग्य विद्यापीठींनी त्याचा उल्लेख आमच्या मागणीनुसार काढून टाकला आहे. पण देशभरात शिकवला जात होता. पुढे बाकीच्या राज्यांनीही दखल घेतली. आम्ही या निर्णयाचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया अंनिसचे कृष्णा चांदगडे यांनी दिली आहे.(Virginity Test Unscientific)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com