मायानगरी मुंबईत गटारी अमावस्येपूर्वी केली जाते रेल्वे रुळांची पूजा, धक्कादायक कारण उघड

रेल्वे (Train) रुळाखाली देवीचे वास्तव्य असल्याच्या श्रद्धेतून रेल्वे रुळांची पूजा केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv
Published On: 

मुंबई: रेल्वे (Train) रुळाखाली देवीचे वास्तव्य असल्याच्या श्रद्धेतून रेल्वे रुळांची पूजा केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर स्थानकाजवळील आहे. ५० ते ६० वर्षापासून ही पूजा सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. गटारी अमावस्यापूर्वी ही पूजा केली जाते. पण अचानक यावेळी रेल्वे आलीतर जीव धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

लक्ष्मी देवी या ठिकाणी आहे, दरवर्षी आम्ही या ठिकाणी पूजा करतो, मी गेली ४० वर्षे इकडे पूजेसाठी येतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai News
एकादशीच्या दिवशीच मरण यावं म्हणून वृद्ध महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

नागरिकांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी पूजा सुरू आहे. याठिकाणी लहान मुलांचा देखील रेल्वे (Train) रुळावर माथा टेकवला जात आहे. तर नागरिकांनी ही पूजा अनेक वर्षापासून सुरू असल्याचे सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाने या पूजेला आजपर्यंत कधीच विरोध केला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Mumbai News
Maharashtra Politics : 'वेळ आली की ठाण्याची दाढी कार्यक्रम करते' (व्हिडिओ पाहा)

या व्हिडिओमध्ये (Video) रेल्वे (Train) रुळाखाली देवीचे वास्तव्य असल्याच्या श्रद्धेतून रेल्वे रुळांची पूजा केली जात असल्याचा दिसत आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर स्थानकाजवळील आहे. ५० ते ६० वर्षापासून ही पूजा सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. गटारी अमावस्यापूर्वी ही पूजा केली जाते. पण अचानक यावेळी रेल्वे आलीतर जीव धोका निर्माण होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com