Pune News: हापूस घेताना फसवणूक होणार नाही, आता आंब्यांना लावणार QR कोड

Pune News: आता कोकणातील चांगल्या दर्जाचा हापूस आंबा योग्य किंमतीत नागरिकांना मिळावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.पुण्यात आता एक आंबा महोत्सव सुरु होणार आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

उन्हाळा सुरु झाला आहे. आता आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. कोकणातील हापूस आंबे आता बाजारात दाखल होतील. परंतु बाजारात फसवणूक सुरु आहे. कोकणातील हापूस आंबा जास्त किंमतीने विकला जात आहे. ही फसवणूक थांबावी म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे.पुणेकरांना कोकणातील दर्जाचा आणि तोही बाजारातील किंमतीच्या तुलनेत स्वस्त मिळावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या पुढाकारातून खास करुन पुणेकरांसाठी पुणे शहरातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये हा आंबा महोत्सव सुरू करण्यात आला आहे.

Pune News
Pune News: महिला शिक्षिका घरी, अन् डमी शिक्षिका शाळेत; 'असं' फुटलं बिंग, थेट घरीच बसवलं

उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमांतर्गत हा महोत्सव दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमधील उत्तम दर्जाच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे.

दरम्यान, या आंबा महोत्सवातच पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांंनी उत्पादित केलेल्या अस्सल गावरान वस्तूंची खरेदी आणि विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. पुणे जिल्हा परिषद आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने मार्केट यार्ड येथे विक्री केंद्र असून यामध्ये एकूण 60 स्टॉल्स आहेत. यापैकी अनुक्रमे पहिले १५ स्टॉल्स हे उमेद अभियानांतर्गत बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तु व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Pune News
Pune Home : पुणेकरांचे घर घेण्याचं स्वप्न महागलं, खरेदी-विक्रीचे दर वाढले, आजपासूनच अंमलबजावणी

बाजारात देवगड आंब्याच्या नावाखाली तुमची फसवणूक होत असते. मात्र, आता ही फसवणूक होणार नाही. कारण कृषी पणन विभागाने आंबा महोत्सवामध्ये प्रत्येक आंब्याला एक क्यूआर कोड दिलेला आहे. हा क्यूआर कोड तुम्हाला मदत करेल.

Pune News
Global Kokan Festival: उद्यापासून ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कशी भेट द्याल? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com