Pune Cyber Crime : पुण्यातील ६० वर्षीय महिला झाली डिजिटल अरेटस्ट, तब्बल अडीच कोटी रुपये लुबाडले

Pune News : सायबर चोरटे लुबाडणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहे. भूलथापा देत किंवा वेगवेगळे आमिष दाखवत लुबाडणूक केली जात आहे. त्यानुसार पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे
Pune Cyber Crime
Pune Cyber CrimeSaam tv
Published On

सचिन जाधव 

पुणे : सायबर गुन्हेगारी फोफावत चालली आहे. यातून अनेकांना गंडा घातला जात आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या डेक्कन परिसरातील एका ६० वर्षीय महिलेला बँक खात्याचा वापर एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाला आहे. यात तुमच्या मुलाचेही नाव असून तुमच्यावर अटक वॉरंट निघू शकते’ अशी भीती दाखवत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेस महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’ केले. या दरम्यान तब्बल दोन कोटी ५७ लाख ५५ हजार रुपयांमध्ये लुबाडणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

सायबर चोरटे लुबाडणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहे. भूलथापा देत किंवा वेगवेगळे आमिष दाखवत लुबाडणूक केली जात आहे. त्यानुसार पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये सायबर चोरट्यानी डिजिटल अरेस्टचा कट रचला. अनोळखी व्यक्तीने महिलेला नरेश गोयल या एका मोठ्या गुन्हेगाराचे छायाचित्र दाखवत ‘तुमच्या खात्यातून या व्यक्तीच्या खात्यावर पैशांची देवाणघेवाण झाली आहे. यामुळे बॅंक खात्याची पडताळणी करावी लागेल. जर तुम्ही कुणालाही याबद्दल सांगितलं, तर तुम्हाला अटक होईल. अशी भीती दाखविली. 

Pune Cyber Crime
Chandan Uti Puja : विठुरायाला दररोज दीड किलो चंदनाचा लेप; विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी बुकिंग फुल्ल

महिनाभर महिला डिजिटल अरेस्ट 

सदर महिलेला डिजिटल अरेस्टमध्ये आहात असे सांगितल्याने महिला गोंधळून गेली. साधारण १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मानसिक छळात महिलेला दररोज नवनवे आदेश दिले जाऊ लागले. महिनाभर ती या चोरट्यांच्या तावडीत होती. या कालावधीत सायबर चोरट्यानी महिलेकडून पैसे उकडले. यात महिलेने २ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये चोरट्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

Pune Cyber Crime
Jalna Water Crisis : जालन्यात पाणीटंचाईच्या झळा; दोन मध्यम प्रकल्प कोरडेठाक, बदनापूर तालुक्यात भीषण स्थिती

अखेर सायबर पोलिसात धाव 
दरम्यान महिनाभरापासून होत असलेला रोजचा त्रासाला कंटाळून अखेर महिलेने १२ मार्चला अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्याला सर्व प्रकार कळताच, त्याने सायबर पोलिसांकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने सायबर पोलिसात जात तक्रार दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा प्रकार केरळ, चेन्नई आणि इतर भागांतील टोळीने चालवला असल्याचा संशय आहे. चोरट्यांची काही बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com