पंढरपूर : उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचे संरक्षण व्हावे, शिवाय थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते. ही परंपरा गेल्या अनेक शतकापासून मंदिरात सुरु आहे. गुडीपाडव्यापासून याची सुरवात झाली असून सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा लेप विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्वांगणाला लावला जात आहे. चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रुप अधिक खुलून दिसत आहे. हेच सुंदर देवाचे रुप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक मंदीरात गर्दी करू लागले आहेत.
सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक वर्षभर दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. तर आता चंदन उटी पूजा सुरु झाल्याने यासाठीची बुकिंग देखील भाविकांनी केली आहे. उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकड्या बरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राण्यांना जसा त्रास होतो. तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते.
लेप लावून चंदन उटी पूजा
यामुळेच दरवर्षी चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्यापासून चंदन उटी पूजेला सुरवात होते. मृग नक्षत्रापर्यंत नियमीत देवाला चंदनाचा लेप लावून चंदन उटी पूजा केली जाते. दररोज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप देऊन पूजा केली जाते. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठुरायाला शीतलता मिळते; अशी यामागची भावना आहे. चंदन उटी पूजेनंतर देवाला शिरा, पोहे, सुका मेवा, कैरीच पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास नैवद्य ही दाखवला जातो.
चंदन उटी पूजेसाठी बुकिंग फुल्ल
चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते. याच काळात मंदिर समितीला चांगले उत्पन्न ही मिळते. चंदन उटी पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कर्नाटकामधील बंगळुरू, म्हैसूर येथून उच्च प्रतीचे ४०० किलो सुगंधी चंदन खरेदी केले आहे. पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे देवाचे रुप सुवर्णालंकार पेक्षाही उठून दिसत आहे. दोन महिन्यातील विठ्ठल आणि रूक्मिणीच्या चंदन उटी पूजा फुल्ल झाल्या आहेत. विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी २१ हजार तर रूक्मिणीच्या पूजेसाठी ९ हजार रुपये देणगी शुल्क आकारले आहे. चंदन उटी पूजेतून मंदिर समितीच्या उत्पन्नात भर पडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.