

Ramdads Athawale News : नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपसोबत फारकत घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासह इतर मित्रपक्षांबरोबर युती करून काही दिवसांपूर्वीच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणाचे समीकरण देखील बदलले आहे. त्यात नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडून महाआघाडी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांना नवा चेहरा मिळाल्याची चर्चा देशाच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना आठवले यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, 'शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. पुढील निवडणुकीत आम्हाला पुढील निवडणुकीत आम्हाला २०० जागा मिळतील. मोदींच्या कार्यकाळात देशभरात चांगले रस्ते आहेत. मात्र, काँग्रेसच्या काळात रस्त्यांची कामे झाली नाहीत. हिंदू, मुस्लिम सर्वांनाच केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा मिळाला आहे'.
राज्यातील राजकारणावर भाष्य करताना आठवले म्हणाले, खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देणे हा देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय चांगला होता. मंत्रिमंडळात विस्तारात आम्हाला स्थान मिळेल ही अपेक्षा आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. शिंदे यांच्याकडे जास्त आमदार, खासदार धनुष्यबाण त्यांनाच मिळणार आहे. स्वतंत्र निवडून येण्याची ताकद अजूनही आमच्यात नाही. मात्र, आम्ही ज्यांना पाठिंबा देतो. ते सत्तेत येतात. आम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. याचं फडणवीसांनी आश्वासन दिलं आहे'.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीश कुमार यांचा चेहरा चालेल का, यावर भाष्य करताना आठवले म्हणाले की, ' नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली तरी त्यात भाजपचं काहीही नुकसान नाही. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली तरी त्यात भाजपचं काहीही नुकसान नाही. नितीश कुमार आता बाहेर पडले असले, तरी पुन्हा परत येतील. नितीश कुमार हे नाही आले तरी काही फरक पडणार नाही. त्यात मोदी यांच्या चेहऱ्यांसमोर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, शरद पवार यांचा कुणाचाही चेहरा चालणार नाही. मी मोदींच्या पाठीशी असल्यानं नरेंद्र मोदी यांनी घाबरण्याचे काही कारण नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.