Nitish Kumar In Mumbai : तिसऱ्या आघाडीसाठी नीतीश कुमारांचं मिशन मुंबई! उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार

Nitish Kumar In Mumbai on 11 May : 'मातोश्री' भेटीनंतर नीतीश कुमार 'सिल्वर ओक' वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करतील.
Nitish Kumar's visit to Mumbai
Nitish Kumar's visit to MumbaiNitish Kumar In Mumbai on 11 May
Published On: 

Nitish Kumar's visit to Mumbai: बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलचे (यूनाइटेड) राष्ट्रीय नेते नीतीश कुमार 11 मे रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेणार असल्याची माहिती जदयूचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.

नीतीश कुमार यांच्यासोबत बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि बिहार सरकारचे मंत्री संजय कुमार झा असणार आहेत. देवेशचंद्र ठाकूर यांनी नुकतीच मुंबईत आमदार कपिल पाटील यांच्या सोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती.

Nitish Kumar's visit to Mumbai
Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनतर सुपुत्र श्रीकांत शिंदेंनी दिली संघाच्या कार्यालयाला भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नीतीश कुमार देशभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि आज ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी भेट घेतली.

मुंबईत 'मातोश्री'वर नीतीश कुमार उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. उद्धव ठाकरे यांनी नीतीश कुमारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे. ते नीतीश कुमारांनी स्वीकारलं आहे. 'मातोश्री' भेटीनंतर नीतीश कुमार 'सिल्वर ओक' वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करतील.

मुंबई विमानतळावर आमदार कपिल पाटील जनता दल यूनाइटेडच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत नीतीश कुमार यांचं स्वागत करतील. कलानगरच्या चौकात जदयूच्या कार्यकर्त्यांकडून नीतीश कुमार यांचं स्वागत होईल. (Latest Political News)

Nitish Kumar's visit to Mumbai
MI vs RCB: मुंबईने आरसीबीविरुद्ध उतरवला हुकमी एक्का! विराट, डू प्लेसिसवर रोहितचा जालीम उपाय

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांची स्वच्छ प्रतिमा, सुशासन आणि संयमी नेतृत्व ही त्यांची ओळख आहे. बिहारचा त्यांनी कायापालट केला. महिलांना सुरक्षित केलं. तरुणांना आशा दिली. आता देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी ते चाचपणी करत आहेत.

नीतीश कुमार यांचा मुंबई दौराही ऐतिहासिक ठरेल. देशाच्या राजकारणाला वेगळं वळण त्यातून मिळेल, अशा भावना आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.