संताेष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंचा अटकपुर्व जामीन फेटाळला

आमदार नितेश राणे यांनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला हाेता.
nitesh rane
nitesh rane
Published On

सिंधूदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील (sindhudurg dcc bank election) प्रचार प्रमुख आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) यांच्यावरील हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (bjp leader mla nitesh rane) यांचा अटकपुर्व जामीन (pre-arrest anticipatory bail) आज (गुरुवार) न्यायालयाने फेटाळला. दरम्यान राणे गटाकडून उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. bjp leader nitesh rane pre arrest anticipatory bail rejected latest news

१८ डिसेंबरला संतोष परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या एका चार चाकीतून चाललेल्यांनी परब यांच्या मोटरसायकलला मागून धडक दिली हाेती. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर एकाने परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. यावेळी परब यांना मारहाण करताना संबंधित व्यक्तीने हा सचिन सावंत याचा प्रचार करताे हे गाेट्या सावंत आणि नितेश राणेंना कळविले पाहिजे असे म्हटलं हाेते. हा हल्ला आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरुन झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे (shivsena) जिल्हा बँक (dcc bank) निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला हाेता. परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी कणकवली पाेलिसांनी (police) या गुन्हाबाबत तपासाची प्रक्रिया सुरु करुन आमदार नितेश राणेंना नाेटीस बजावत तपासाकामी कणकवली पाेलिस ठाण्यात हजर राहण्याचे सांगितले हाेते.

त्यानंतर काही दिवसांनी नितेश राणे हे कणकवली (kankavali) पाेलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांची चाैकशी झाली. या चाैकशी दरम्यान नितेश राणेंनी त्यांच्यावरील आराेप फेटाळले. त्यानंतर राणे हे सिंधूदूर्ग जिल्ह्यातून गायब झाले. दरम्यानच्या काळात राणेंच्या वतीने संताेष परब हल्ला प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला गेला. त्यावर गेले तीन दिवसांपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्या समाेर सुनावणी झाली.

बुधवारी दाेन्ही बाजूचा युक्तीवाद पुर्ण झाला हाेता. आमदार नितेश राणेंचा (nitesh rane) अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी विविध मुद्दे मांडत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयास (court) मागणी केली हाेती. नितेश राणेंच्या बाजूने संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला.

३३ वेळा दूरध्वनी केला गेला

पुण्यातील पाच आराेपींची नावे पाेलिसांनी जाहीर केली नाहीत. यामध्ये नेमकं गाैडबंगाल काय आहे अशी चर्चा काेकणात (kokan) सुरु हाेती. यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देखील संबंधित आराेपी हे एकमेकांच्या संपर्कात हाेते. या सर्वांची पाेलिसांना चाैकशी करणे आवश्यक आहे. धीरज जाधव, ज्ञानेश्वर माऊल आणि सचिन सातपुते यांचा आमदार नितेश राणे आणि त्यांच्या पीए बराेबर संबंध आहेत. नितेश राणे यांच्या पीएकडून सचिन सातपुते यास ३३ वेळा दूरध्वनी (phone) केला गेला असा युक्तीवाद केला हाेता.

nitesh rane
न्यायालयाचा निकाल समजताच नारायण राणे गटास बसला धक्का

वकीलांची खडाजंगी

बुधवारी राणेंच्या वकीलांची आणि सरकार वकीलांची सुनावणी दरम्यान खडाजंगी झाली हाेती. राणेंचे वकील देसाई यांनी सरकारी वकील प्रदीप घरत हे वेळ काढूपणा करीत असल्याचा आक्षेप नाेंदविला हाेता. नितेश राणेंच्या मोबाईलवरून (mobile) आरोपीला एकही काॅल गेला असा पुरावा नाही असे देसाईंनी नमूद केले हाेते. सचिन सातपुते यांचे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसमवेत संबंध होते. तो भाजपचा कार्यकर्ता होता. मग नितेश राणे यांचा फोटो (photo) महत्वाचा आहे का? या संपूर्ण प्रकरणात गोट्या सावंत यांचा सहभाग कसा? या बद्दल कोणतीही परिस्थिती या संपूर्ण केसमध्ये समजत नाही असा युक्तीवाद देसाई यांनी केला हाेता.

सीडीआर जुळले हाेते

दरम्यान मंगळवारी देखील दाेन्ही पक्षाकडून जाेरदार युक्तीवाद करण्यात आला हाेता. सातपुते यास दिल्लीत अटक (arrest) झाली हाेती. सातपुते आणि राणे यांचा सीडीआर (call record data) मिळते जुळते असल्याचा दावा पाेलिसांनी केला हाेता. त्यामुळे नितेश राणेंची अडचणी वाढणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात हाेती. नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे संभाषण हाेणे म्हणजे राणेंनी कटकारस्थान केले असे हाेत नाही. पाेलिसांनी अनेक गाेष्टी माध्यमांपासून (media) लपवली आहे. पाेलिसांवर राजकीय दबाव असल्याने नितेश राणेंचे नाव गाेवलं गेले असं देसाई यांनी नमूद केले हाेते.

सकाळी बसला नारायण राणे गटास धक्का

आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानासाठी जाता यावे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे गटाचे उमेदवार मनीष दळवी यांचा अंतरिम (तात्पूरता) जामीन न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे अटकेच्या भीतीने दळवी हे मतदानासाठी केंद्रावर आलेच नाही. दूसरीकडे प्रमाेद वायंगणकर हे गेल्या दिवासांपासून कणकवलीतून गायब असल्याने त्यांचे देखील मतदान हाेऊ शकले नाही. तर नितेश राणे यांच्या संस्थेच्या काेट्यावधीच्या थकबाकीमुळं त्यांचा मतदानाचा हक्क सहकार विभागाने रद्द केला हाेता. त्यामुळे त्यांचे देखील मतदान हाेऊ शकलं नाही.

आजच्या निकालाकडे राज्याचे हाेते लक्ष

आज (गुरुवार) न्यायालयात जामीन (bail) अर्जावर निकाल काय लागताे याची चर्चा सिंधूदूर्ग (sindhudurg) आणि कणकवलीत हाेती. दाेन्ही गटाचे समर्थक न्यायालय परिसर तसेच शहरात गटा गटाने हाेते. आजच्या निकालाकडे काेकणासह राज्यातील राजकीय (political) क्षेत्राबराेबरच नागरिकांचे लक्ष हाेते.

या निकालाच्या पार्श्वभुमीवर दोन दंगल पथके कणकवलीत तैनात करण्यात आले हाेते. शिवसेना शाखेत आमदार वैभव नाईक, सतीश सावंत उपस्थित हाेते. या शाखे बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला हाेता. दरम्यान निकाल समजताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. आमदार वैभव नाईक यांनी राणेंनी पाेलिसांनी सहकार्य करावे. त्यांनी हजर व्हावे अशी भावना व्यक्त केली.

nitesh rane
दात पाडीन; सेना नेत्याची भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यास धमकी

जिल्हा बॅंकेसाठीचे मतदान पुर्ण

आज सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा बँक निवडणुकीसाठी चार वाजता मतदान पुर्ण झाले. कणकवली वगळता अन्य ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. या मतदानानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमाेर आले. काही कारणास्तव दाेन्ही गटात शाब्दिक चकमकी उडाल्या. पाेलिसांनी दाेन्ही गटाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समज देत बाजूला केला.

उद्या मतमाेजणी

यंदा आमदार नितेश राणेंच्या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही लढत आहे. उद्या (शुक्रवार) निवडणुकीची मतमाेजणी हाेणार आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com