जनावरांना पाणी पाजताना शिवडीत विपरीत घडलं! कालव्यात पडून बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

12th Class Student Drowned In Canal: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिवडी गावाजवळील पालखेड कालवा परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
NASHIK TRAGEDY: CLASS 12 STUDENT DROWNS IN CANAL WHILE WATERING CATTLE
NASHIK TRAGEDY: CLASS 12 STUDENT DROWNS IN CANAL WHILE WATERING CATTLEsaam tv
Published On
Summary
  • जनावरांना पाणी पाजताना १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू.

  • पालखेड कालव्यात तोल जाऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

  • घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवडीत एक धक्कादायक घटना घडलीय. गुरांना पाणी पाजताना १७ वर्षीय विद्यार्थ्याचा डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सुमारास घडली. ओम नवनाथ जाधव (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता.ओम संध्याकाळी जनावरे पाणी पाजण्यासाठी पालखेड कालवा परिसरात गेला होता.

NASHIK TRAGEDY: CLASS 12 STUDENT DROWNS IN CANAL WHILE WATERING CATTLE
Raigad Crime: जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी; भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी शोधकार्य सुरू केले. तसेच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने शोधमोहीम राबवली. अंधारामुळे रविवारी रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला.

अखेर दुपारी सुमारे तीन वाजता पालखेड डावा कालवा,चारी क्रमांक १४ जवळ ओमचा मृतदेह आढळून आला. ओम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिवडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

NASHIK TRAGEDY: CLASS 12 STUDENT DROWNS IN CANAL WHILE WATERING CATTLE
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

चुलतीसह २ सख्खा बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळमध्ये गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या चुलतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दोन मुली आपल्या काकूसह गोदावरी नदी पत्रात आंघोळीसाठी गेल्या होत्या. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. या दोन्ही मुली गोदावरी नदी पात्रात उतरल्या आणि त्या थोड्या दूरपर्यंत गेल्या. तेथे मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्या बुडू लागल्या. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून काकूनं नदीकडे धाव घेतली. दोघांना वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेतली. मात्र त्या दोघांना वाचवताना काकूही पाण्यात बुडाल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com