TCS धर्मांतर प्रकरणातील निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम! कोर्टात काय युक्तिवाद झाला?

Nida Khan Anticipatory Bail Hearing Nashik Update: नाशिकमधील TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी निदा खान हिला अटकपूर्व जामिनावर कोणतेही संरक्षण मिळालेले नाही.
Nida Khan faces uncertainty as Nashik court defers bail decision in high-profile TCS conversion case.
Nida Khan faces uncertainty as Nashik court defers bail decision in high-profile TCS conversion case.saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिकमधील TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी नाशिकरोड सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अंतिम सुनावणी 27 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. मात्र तो पर्यंत निदा खानला अटकेपासून कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही, त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Nida Khan faces uncertainty as Nashik court defers bail decision in high-profile TCS conversion case.
Nagpur Vidhansabha Andolan News | गळ्यात कापसाच्या माळा घालत विरोधकांचं अनोखं आंदोलन

दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

याच प्रकरणातील इतर दोन आरोपी शफी शेख आणि रझा मेमन या दोघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासी यंत्रणेने त्यांचा मोबाईल पासवर्ड मिळवण्यासाठी यापूर्वी कोठडी घेतली होती. आज न्यायालयाने या दोघांचीही रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान पोलीस आता त्यांना इतर गुन्ह्यांत वर्ग करून पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली.

Nida Khan faces uncertainty as Nashik court defers bail decision in high-profile TCS conversion case.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

कोर्टात झाला जोरदार युक्तिवाद

1. सरकारी पक्ष आणि पीडितेची वकील

सरकारी वकील किरण बेंडभर आणि पीडितेचे वकील मिलिंद कुरकुटे यांनी निदा खानच्या जामिनाला जोरदार विरोध दर्शवला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून महिला आयोगानेही याची दखल घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या गुन्ह्यात अ‍ॅट्रोसिटीचे कलमही वाढवण्यात आले असून सरकार पक्षाला आपली सविस्तर बाजू मांडण्यासाठी वेळ हवा असल्याची मागणी करण्यात आली.

Nida Khan faces uncertainty as Nashik court defers bail decision in high-profile TCS conversion case.
Nashik TCS Case: आसिफ ऑफिसमध्ये माझ्या मांडीवरून हात फिरवायचा अन्...; नाशिक TCS प्रकरणात महिला कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

निदा खानच्या वकिलांचा युक्तिवाद

निदा खानचे वकील राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात दावा केला की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्री होती आणि धार्मिक भावना दुखावणारा कोणताही प्रकार घडलेला नाही. या प्रकरणात राजकीय रंग दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे, निदा खान गर्भवती असल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करत मेडिकल ग्राऊंडवर जामिनाची मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com